रशियाविरुद्ध युक्रेनची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव, केली 'ही' मागणी

russia ukrain war Update Ukraine approached international court of justice against Russia
russia ukrain war Update Ukraine approached international court of justice against Russia

Russia-Ukraine War : सध्या जगाचे लक्ष हे रशिया युक्रेन युध्दाकडे (Russia Ukraine Crisis) लागले आहे. रशियाच्या आक्रमणाचा युक्रेन जोरदार प्रतिकार करत आहे. दरम्यान युक्रेन विरुद्ध केलेल्या आक्रमणासाठी रशियाला जबाबदार धरण्यासाठी युक्रेनने रविवारी रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात (International Court of Justice) धाव घेतली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी, युक्रेनने रशियाविरुद्धचा अर्ज आयसीजेकडे सादर केला आहे. आक्रमकतेने युक्रेनमध्ये नरसंहार केल्याबद्दल रशियाला जबाबदार धरले पाहिजे. तसेच आम्ही रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश देण्याची विनंती करतो आणि पुढील आठवड्यात याप्रकरणी सुणावणी सुरू होण्याची अपेक्षा करतो, असे एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

russia ukrain war Update Ukraine approached international court of justice against Russia
युक्रेनला मस्क यांच्याकडून मदत, सुरू केली सॅटेलाईट इंटरनेट सेवा

युक्रेनवर रशियन सैन्याच्या कारवाईच्या चौथ्या दिवशी, रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किववर आक्रमण केल्याने रशियन आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये चकमक सुरू आहे.

युक्रेन विरुद्ध रशियाच्या कारवाईत बेलारूसचा सहभाग असल्याचा आरोप करून राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बेलारूसमध्ये चर्चेसाठी रशियाचा प्रस्ताव नाकारला आहे. झीलेन्स्की म्हणाले की ते देखील चर्चेस तयार आहेत परंतु बेलारूसमध्ये नाही. चर्चेसाठी पर्यायी ठिकाणे वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापेस्ट, इस्तंबूल, बाकू असू शकतात, असे ते म्हणाले.

russia ukrain war Update Ukraine approached international court of justice against Russia
एअरटेलचा 365 दिवसांचा प्लॅन, दररोज 2GB डेटा, Disney + Hotstar देखील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com