युक्रेनमध्ये आणखी एका भारतीयाला लागली गोळी; हॉस्पिटलमध्ये दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीयाला लागली गोळी; हॉस्पिटलमध्ये दाखल

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीयाला लागली गोळी; हॉस्पिटलमध्ये दाखल

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अनेक निष्पापांचेही जीव जात आहेत. दोन दिवसांपूर्वी एका भारतीय विद्यार्थ्यालाही आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर आता युक्रेनची राजधानी किव्हमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: 2022 मधल्या कोरोना मृतांपैकी 92 टक्के मृत्यू लस न घेतलेल्यांचे: ICMR

माध्यमांशी बोलताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री (MOS) जनरल व्हीके सिंग यांनी पोलंडच्या रझेझो विमानतळावर असताना ही माहिती दिली आहे. जनरल सिंग यांनी माध्यमांना सांगितलं की, कीव्हमध्ये राहत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली आणि त्याला तात्काळ कीव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हेही वाचा: शर्टलेस,किसिंग सीन देताना प्रभासने घातल्यात अटी; दिग्दर्शकही हैराण

"भारतीय दूतावासातील सर्वांनी याआधीच कीव्ह सोडले पाहिजे, असे याआधीच स्पष्ट केले होते. युद्धाच्या प्रसंगी बंदुकीची गोळी कोणाचाही धर्म आणि राष्ट्रीयत्व पाहत नाही," असंही ते यावेळी म्हणाले आहेत. सध्या भारताचे चार केंद्रीय मंत्री, हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्हीके सिंग युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाऊन भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत.

Web Title: Russia Ukraine Conflict Another Indian Student Shot In Kyiv Hospitalised

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top