रशियाची नवीन युद्ध नीती ! युक्रेनने जर्मनीकडे मागितली शस्त्रे | Russia Ukraine War | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Ukraine War

रशियाची नवीन युद्ध नीती ! युक्रेनने जर्मनीकडे मागितली शस्त्रे

किव्ह : युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी उत्तर अटलांटिक करार संघटनेकडे (नाटो) त्यांच्या युद्धग्रस्त देशाला शस्त्रे पुरवठा करण्याची विनंती केली आहे. कुलेबा हे आज गुरुवारी (ता.सात) नाटो मुख्यालयात संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. ते म्हणाले, माझा उद्देश खूप साधा आहे. ते म्हणजे शस्त्रे, शस्त्रे आणि फक्त शस्त्रे. आम्हाला युद्ध करता येते. आम्हाला जिंकता येते. मात्र युक्रेन (Ukraine) जे मागत आहे, त्याच्या नियमित आणि पुरेशा पुरवठा झाला. नाहीतर अनेकांचा बळी घेतला जाईल. परराष्टमंत्री म्हणाले, जितक्या लवकर आम्हाला शस्त्रे मिळतील आणि जितक्या लवकर ते पोहोचतील, त्याने लोकांचा जीव आम्ही वाचवू शकू. (Russia Ukraine Crisis Ukraine Asks Germany To Supply Weapons)

हेही वाचा: Heat Waves ! राज्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा

कुलेबा यांनी जर्मनीकडे (Germnay) आग्रह केला, की अत्यावश्यक संरक्षण सामग्री लवकरात- लवकर पाठवावे. ते म्हणाले, बर्लिनजवळ वेळ आहे. पण किव्ह जवळ नाही.

युक्रेनच्या पूर्व भागांवर हल्ले करण्याची रशियाची तयारी

रशियाने (Russia) युक्रेनची राजधानी किव्हच्या बाहेरील भागांमधून आपले सैन्य हटवले आहे. मात्र हा देश पूर्व भागातील डोनबासवर हल्ले करण्यास वेगाने तयारी करित आहे. प्रशासनाने सदरील भागातील नागरिकांना लवकरात-लवकर तेथून निघून जाण्यास सांगितले आहे. दक्षिणेतील बंदराचे शहर मारियुपोलचे महापौर यांनी बुधवारी (ता.सहा) सांगितले, की शहरात पाच हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: रोहित तू बिनधास्त जा, नितीन गडकरींनी आबांच्या लेकाला दिला शब्द

दुसरीकडे राजधानीच्या उत्तर भागांमध्ये युक्रेनचे अधिकारी रशियाच्या अन्यायाचे पुरावे जमा करित आहेत. या भागातून जाताना माॅस्कोच्या सैनिकांनी गेल्या अनेक दिवसांत लोकांची हत्या केली आहे. रात्री आपल्या संबोधनात युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskky) यांनी इशारा दिला की रशियाची सेना पूर्व भागात नव्याने हल्ले करण्याची तयारी करित आहे. क्रेमलिनचे म्हणणे आहे, की त्याचा उद्देश डोनबासला मुक्त करायचे आहे.

Web Title: Russia Ukraine Crisis Ukraine Asks Germany To Supply Weapons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..