
भारतीयांनो, युक्रेनमध्ये अडकलाय? या नंबरवर लावा फोन; सुटकेसाठी वाचा माहिती
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवरील हल्ला केल्याने युक्रेनमध्ये भयावह परिस्थितीत राहणाऱ्या नागरिकांत हजारो भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने भारताची चिंता वाढली आहे. युक्रेनची राजधानी किव्ह व अन्य शहरांत किमान २० हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यास निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला, रशियाने हल्ला केल्याचे समजताच इराणच्या हवाई हद्दीतूनच यू टर्न घेणे भाग पडले. (Russia Ukraine crisis)
युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी सहाय्य करण्यास हवाई दलाने तयारी दाखविली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी हवाई दल सज्ज असून सरकारच्या निर्देशांची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे हवाई दलातर्फे सांगण्यात आले. मात्र आपल्या पाल्यांच्या जिवाच्या भितीने घाबरलेल्या भारतीय नागरिकांनी विदेश व्यवहार मंत्रालयावर दूरध्वनी, मेलचा वर्षाव सुरू केला आहे. (russia ukraine war updates)
हेही वाचा: Ukraine-Russia War Live: कीवमधील भारतीय विद्यार्थ्यांशी राजदूतांनी साधला संवाद
दरम्यान किव्हमधील भारतीय दूतावासाने सायंकाळच्या सुमारास चौथ्यांदा दिशानिर्देश जारी करून भारतीयांना आपापल्या घरांत व सुरक्षित जागांवरच थांबण्याचा सल्ला दिला आहे. मात्र युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांत प्रचंड घबराट पसरली असून लाखो नागरिकांनी भूमिगत रस्ते व बंकर्सकडे धाव घेण्यास सुरवात केल्यामुळे तिथे अफरातफरी उडाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना मन शांत ठेवण्याचे व वर्तमान संकटाला धाडसाने तोंड देण्याचे आवाहन पुन्हा केले आहे. एअर इंडियाचे विमान माघारी परतले. मात्र हवाई दलातर्फे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा मार्ग अजूनही खुला असल्याचे सांगितले जाते. पर्यायी उपाय योजनेसाठी केंद्र सरकार सातत्याने विचारविनिमय करत आहे. (latest news of russia ukraine war)
युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यात तेथील अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची पथके युक्रेनलगतच्या हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाक रिपब्लिक या देशांमध्ये पाठविली जाणार आहेत. युक्रेनमधील नागरिकांनी या पथकांमधील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! PM मोदी करणार पुतीन यांना फोन; भारत मध्यस्थ होणार?
मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाची पथके
हंगेरीमधील झाहोनी या सीमेवरील नाक्यावर जाणाऱ्या भारतीय पथकात तिघांचा समावेश आहे. एस. रामजी (व्हॉटसॲप क्रमांक +९१७३९५९८३९९०), अंकुर (+३६३०८६४४५९७) आणि मोहित नागपाल (+९१८९५०४९३०५९) यांचा पथकात समावेश आहे. पंकज गर्ग (+४८६०६७००१०५) हे पोलंडमधील क्रॅकोविक सीमेवर साह्य करणार आहेत. स्लोव्होक सीमेवरील व्हिस्न नेमेक येथे मनोजकुमार (+४२१९०८०२५२१२) आणि इव्हान कोझिंका (+४२१९०८४५८७२४) हे अधिकारी जाणार आहेत. तर रोमानिया येथील सीमेवर सकीव्हा येथे गौशुल अन्सारी (+४०७३१३४७७२८), उद्देश्य प्रियदर्शी ( +४०७२४३८२२८७), अँड्रा हॅरिओनोव्ह (+४०७६३५२८४५४) आणि मॅरियस सायमा (+४०७२२२२०८२३) हे अधिकारी जातील.
Web Title: Russia Ukraine War Indians In Ukraine Call This Number Read Detailed Information
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..