रशियाला ताब्यात हवीत युक्रेनमधील 'ही' पाच शहरं; जाणून घ्या कारण

असे कोणते शहरं आहेत ज्यांच्यावर रशिया ताबा मिळवण्यासाठी धडपडत आहे? जाणून घेऊया.
Ukraine
UkraineSakal

रशिया आणि युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रशियाने मंगळवारी केलेल्या खारकीव येथील हल्ल्यात आठ लोकं मरण पावले असून सहाजण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. याआधी खारकीव येथील पहिल्या हल्ल्यात ३५ लेकांचा मृत्यू आणि ३५ जण जखमी झाले होते. रशियाने युक्रेनच्या काही शहरांना टार्गेट केलं आहे आणि त्यांच्यावरील हल्ल्याचं प्रमाण वाढवलं आहे. असे कोणते शहरं आहेत ज्यांच्यावर रशिया ताबा मिळवण्यासाठी धडपडत आहे? जाणून घेऊया.

१) कीव (Kyiv)

ही युक्रेनची राजधानी असून प्राचीन शहरांपैकी एक आहे. हे शहर प्राचीन चर्च आणि मठांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराची लोकसंख्या २९ लाख इतकी आहे. आणि १९९१ पासून ही युक्रेनची राजधानी आहे. रिपोर्टनुसार रशियाने या शहराला चारही बाजूंनी घेरलं आहे. कारण सरकार येथूनच चालवलं जातं आणि या शहरावर ताबा मिळवून रशिया युक्रेनचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याअगोदर पुतीन यांनीही याबाबत घोषणा केल्या होत्या.

Ukraine
Russia Ukraine: लग्नानंतर काही तासातच मायभूमीसाठी घेतली हातात शस्त्रे

२) खारकीव (Kharkiv)

हे युक्रेनमधील दुसरं मोठ शहर असून ते रशियाच्या सीमेपासून फक्त ४० किलोमीटर अंतरावर आहे. या शहराची लोकसंख्या १४ लाख एवढी असून येथे रशियन भाषा बोलली जाते. सुरुवातीला या शहरात रशियाने मोठे बॉम्बहल्ले केले होते. दुसऱ्या महायुद्धातसुद्धा या शहराचं मोठं नुकसान झालं होतं. 2014 च्या नंतरपूर्व डॉनबास प्रदेशात सरकारी सैन्य आणि रशियाला समर्थन करणाऱ्यांच्या लढाईतून पळून जाणाऱ्या लाखो लोकांचे घर आहेत. आणि खारकीव शहर हे डॉनबासच्या जवळ असल्याने यावर ताबा मिळवून डॉनबासला फायदा होईल म्हणून हे शहर रशियासाठी महत्त्वाचं आहे.

३) मारियुपोल (Mariupol)

हे शहर समुद्रकिनारी वसलेलं शहर असून प्रमुख बंदराच्या शहरांपैकी एक आहे. ४ लाख ४१ हजार लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. हे शहर फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील प्रदेश आणि क्रिमिया यांच्यामध्ये वसलेलं असल्याने रशियाच्या दृष्टीन ते महत्त्वाचं शहर आहे. क्रिमिया 2014 पासून रशियाच्या ताब्यात आहे, म्हणून हे शहरही रशियाच्या ताब्याच असावं असं रशियाला वाटतं आहे.

Ukraine
Ukraine Russia: झेलेन्स्की यांची बायडेनसोबत चर्चा; म्हणाले...

४) बर्डियांस्क (Berdyansk)

या शहराची लोकसंख्या केवळ एक लाख १५ हजार इतकी आहे. बीच आणि मड बाथसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. रशियन सैनिकांनी सोमवारी बर्डियांस्कच्या बंदरावर ताबा मिळवण्याचा दावा केला होता. हे शहर मारियुपोलपासून फक्त ८४ किमी. दूर आहे.

५) खेरसॉन (Kherson)

खेरसॉन या शहराची लोकसंख्या 287,000 एवढी आहे. खेरसॉनला रशियन सैन्याने घेरले असल्याचं बोललं जात आहे. हे शहर नीपर नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक मोक्याचं बंदर असून क्रिमियन द्वीपकल्पासाठी अत्यंत मोक्याचे शहर आहे. हे शहर एकेकाळी रशियन ब्लॅक सी फ्लीटचे तळ होते. त्याच्यावर ताबा मिळाल्यामुळे रशियासाठी पश्चिमेकडे ओडेसा या शहराकडे जाण्यासाठी रस्ते मोकळे होतील ज्यात बहुसंख्य रशियन भाषिक लोक असून त्याच्यानंतर लगेच नाटोचे सदस्य देश, रोमानिया आणि मोल्दोवा या शहरांच्या सीमा लागतात म्हणून हे शहर रशियासाठी महत्त्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com