धक्कादायक! १३ वर्षाच्या मुलीच्या पोटात १० वर्षाच्या मुलाचं बाळ, डॉक्टर म्हणतात...

वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

रशियातील झेलेझ्नोगोर्स्क शहरातील एका १३ वर्षीय मुलीने असा दावा केला आहे की, ती एका १० वर्षाच्या मुलाच्या बाळाची आई होणार आहे. तिने एका टीव्ही कार्यक्रमात असे सांगितले आहे. तिच्या पोटात तिच्या १० वर्षाच्या मुलाचं बाळ आहे.

झेलेझ्नोगोर्स्क : रशियातील झेलेझ्नोगोर्स्क शहरातील एका १३ वर्षीय मुलीने असा दावा केला आहे की, ती एका १० वर्षाच्या मुलाच्या बाळाची आई होणार आहे. तिने एका टीव्ही कार्यक्रमात असे सांगितले आहे. तिच्या पोटात तिच्या १० वर्षाच्या मुलाचं बाळ आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ती एक वर्षाआधी या मुलाला भेटली असल्याचे तिने सांगितले आहे. डारिया असं त्या मुलीचं आणि इव्हान असं त्या १० वर्षीय मुलाचं नाव आहे. दोघेही नुकतेच एका टीव्ही कार्यक्रमात आले होते. मुलीने असा दावा केला असला तरी तरी मुलाची टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांनी तिचा दावा खोडून काढला आहे. डॉक्टर म्हणतात, इव्हान शुक्राणू निर्मित करण्यासाठी फारच लहान आहे. तो आता पिता होऊच शकत नाही.

IndvsNZ : दुसरा सामना जिंकत के एल राहुलचे अनोखे दोन विक्रम

डारिया ठामपणे हे सांगते की, तिच्या पोटात असलेलं बाळ हे दुसऱ्या कुणाचं नसून इव्हानचच आहे. द सनने बातमीनुसार दोघेही पालकांच्या परवानगीने या कार्यक्रमात गेले होते. टीव्ही कार्यक्रमानंतर सगळीकडे दोघांचीच चर्चा रंगली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ८ महिन्यांची गर्भवती डारिया आणि तिच्या आईची बाळाला ठेवण्याची इच्छा असल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे इव्हानच्या आईचा देखील यावर विश्वास आहे. डारिया म्हणाली, ती आणि तिचा प्रियकर एकमेकांची पूर्ण काळजी घेतात. दोघांनीही सोशल मीडियावर रिलेशनशिप स्टेटस मॅरीड असं ठेवलं आहे.

मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार तिथेच काँग्रेस नेत्यांची हाणामारी

तत्पूर्वी, कमी वयात मुलींना बाळाला जन्म द्यावा लागल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो परंतु, एखादा १० वर्षांचा मुलगा बाबा आणि १३ वर्षांची मुलगी आई होणार अशी विचित्र घटना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russian girl 13 claims boy 10 made her pregnant