
रशियाला केवळ चारंच मित्र; झेलेन्स्कींचे पुतिन यांना चिमटे
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गुरुवारी आठव्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीची युद्धाच्या मुद्यावरून बुधवारी रात्री पुन्हा एकदा बैठक पार पडली. ज्यामध्ये रशियाच्या विरोधात ठराव आणण्यात आला. यामध्ये रशियाला युक्रेनमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. हा ठराव UNGA मध्ये मंजूर झाला, पण रशियासह पाच देशांनी याला विरोध केला. या भूमिकेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना केवळ चारच मित्र असल्याचे म्हणच चिमटे काढले आहेत. एवढ्या मोठ्या रशियाचे जगात केवळ चारच देश मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Ukraine Precedent Corner Putin After UN Voting)
हेही वाचा: Ukraine : भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाचा मोठा निर्णय
193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेने रशियन हल्ल्याचा निषेध केला आणि सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले. या मुद्द्यावर मतदानही झाले, ज्यामध्ये भारत सहभागी झाला नाही. युक्रेन विरुद्ध पुकारलेल्या आक्रमकते विरोधाच्या प्रस्तावावर 94 UN सदस्यांनी आपले मत मांडले, ज्यापैकी 141 सदस्यांनी सैन्य मागे घेण्याच्या समर्थनार्थ होते. तर 34 जणांनी मतदान केले नाही. याशिवाय पाच देशांनी या निर्णयाविरोधात मतदान केले.
रशियाशिवाय बेलारूस, इरिट्रिया, उत्तर कोरिया आणि सीरियाने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया देत वरील चौघांशिवाय रशियाकडे कोणीही मित्र उरले नसल्याची खोचक टीका केली आहे.
हेही वाचा: Photos : युक्रेनच्या लढवय्याने युरोपियन संसदेतही जिंकली मनं
भारताची भूमिका काय
रशिया-युक्रेन युद्धाबाबत पहिल्यादिवसापासून भारताने तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याला आमचे प्राधान्य असल्याचे भारताकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. युनायटेड नेशन्समधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, भारत युद्धबंदीला पाठिंबा देत असून, यावेळी त्यांनी युक्रेनच्या शेजारी देशांना सीमा ओलांडण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मतभेद केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवले जाऊ शकतात असे मतदेखील UN मध्ये भारताने मांडले.
Web Title: Russian Have Only Four Friends In Whole Worlds Says Zelensky
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..