Video : युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाईल हल्ले, शेकडो ठार

हल्ल्यांची तीव्रता पाहता मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Ukraine
Ukraine Sakal

Russian Missile Attack in Ukraine : युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अद्याप यात मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकाडा समोर आलेला नाही. परंतु, हल्ल्यांची तीव्रता पाहता मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राजधानी कीवच्या महापौरांकडून दुजोरा

दरम्यान, युक्रेनच्या विविध भागांमध्ये मिसाईद्वारे हल्ले करण्यात आल्याच्या वृत्ताला कीवच्या महापौरांकडून दुजोरा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, संपूर्ण युक्रेनमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांनतर रशिया आम्हाला जगाच्या नकाशावरून कायमचे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनची गुप्तचर संस्था एसबीयूच्या मुख्यालयालाही रशियाकडून लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे.

Ukraine
Politics : सत्तार- अमृता फडणवीसांवर दानवेंचा हल्लाबोल; म्हणाले, त्यांनी काय काय...

एफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 8:15 वाजता हे हल्ले करण्यात आला. यापूर्वी रशियाने 26 जून रोजी कीववर अखेरचा हल्ला केला होता. युक्रेनने क्रिमियन पुलावर स्फोट घडवल्याचे म्हणत हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणीही घेतलेली नाहीये, मात्र, पुतिन यांनी यासाठी युक्रेन आणि युरोपला जबाबदार धरले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com