व्लादिमीर पुतीन यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याचा प्रयत्न फसला

आतापर्यंत व्लादिमीर पुतीन यांना पाचवेळा मारण्याचा प्रयत्न झाला मात्र..
vladimir putin
vladimir putinvladimir putin
Summary

आतापर्यंत व्लादिमीर पुतीन यांना पाचवेळा मारण्याचा प्रयत्न झाला मात्र..

अनेक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या घडामोडींसाठी रशियाचे (Russia) राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची खास ओळख आहे. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. यूक्रेनचे चीफ ऑफ डिफेन्स इंटेलिजन्स कायरलो बुडानोव यांनी पुतीन यांच्यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. पुतीन यांच्या निर्णयांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आतापर्यंत व्लादिमीर पुतीन यांना पाचवेळा मारण्याचा प्रयत्न झाला मात्र, पाचही प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी रशियानं यूक्रेन विरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर काही दिवसांमध्ये व्लादिमीर पुतीन यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तो प्रयत्न अयशस्वी झाल्याचा दावा कायरलो बुडानोव यांनी केला आहे. मात्र, कायरलो बुडानोव यांनी पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न कुणी केला हे समोर आणलेलं नाही. त्यामुळे ही घटना एक गुपीत बनुन राहिली आहे.

vladimir putin
शिवसेना राज्यसभेसाठी अर्ज करण्याआधी अनिल परबांच्या घरी ED ची छापेमारी

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनाही त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती वाटत आहे. त्यामुळं ते सातत्यानं सुरक्षा रक्षकांसोबत असतात. कायरलो बुडानवो यांनी वरील पुतीन यांच्यासंदर्भातील माहिती सार्वजनिक नसल्याचं म्हटलं असून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो अयशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेबद्दल कुठेही वाच्यता करण्यात आलेली नाही.

व्लादिमीर पुतीन यांना यापूर्वी चार वेळा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्लादिमीर पुतीन २००२ मध्ये अजरबैजानच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी एका इराकी नागरिकाला अटक करण्यात आली होती. दुसरा हल्ला २००२ मध्येच झाला होता, पुतीन यांच्या गाडीला उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. २००३ मध्ये व्लादिमीर पुतीन यांची हत्या करण्यासाठी कट करणाऱ्या दोघांना ब्रिटीश अँटी टेरर पोलिसांनी अटक केली होती. त्यामागे रशियाच्या सीक्रेट सर्विसचा हात होता.

vladimir putin
हृदयद्रावक! सेनेगल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

२०१२ मध्ये चेचन्या बंडखोरांकडून पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, व्लादिमीर पुतीन यांनी विषारी पदार्थांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी विशेष साधन बनवण्याचे आदेश दिले आहेत. व्लादिमीर पुतीन हे सकाळी पोहायला जातात त्यावेळीही पाण्याची तपासणी केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com