esakal | 'किलर' टीकेनंतर गप्प बसतील ते पुतीन कसले! बायडेन यांना जशास तसं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

putin biden

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचे समकक्ष अमेरिकेचे ज्यो बायडेन यांना प्रत्युतर दिलं आहे.

'किलर' टीकेनंतर गप्प बसतील ते पुतीन कसले! बायडेन यांना जशास तसं उत्तर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मॉस्को- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचे समकक्ष अमेरिकेचे ज्यो बायडेन यांना प्रत्युतर दिलं आहे. एखाद्याला समजण्यासाठी आधी त्यासारखं असावं लागतं, असं ते म्हणाले आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुतीन यांना किलर असं संबोधलं होतं. त्यामुळे जागतिक वातावरण  तापलं आहे. रशियाने बायडेन यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय अमेरिकेतील आपल्या राजदूताला परत बोलवण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष पुतीन यांनीही या वक्तव्याची दखल घेतली असून यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. क्रिमीयाला रशियात (2014) सामिल करुन घेण्याच्या दिनानिमित्त पुतीन एका वाहिनीनर कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी अमेरिका आणि ज्यो बायडेन यांना सुनावलं.

मी त्यांना म्हणेन की, मी तुमच्या चांगल्या आरोग्याची कामना करेन. कॉमन इंटरेस्ट असणाऱ्या क्षेत्रामध्ये रशिया अमेरिकेसोबत पुढेही काम करत राहील, असं पुतीन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, त्यांना वाटतं की आम्ही त्यांच्यासारखेच आहोत, पण आम्ही वेगळे लोक आहोत. आमचा वंश वेगळा आहे आणि आम्ही सांस्कृतिक-नैतिक दृष्या वेगळे आहोत. गुलामगिरी असो किंवा दुसऱ्या युद्धामध्ये अमेरिनेने न्यूक्लिअर शस्त्राचा वापर करणे असो, ते आम्ही केलेलं नाही. 

देशात महाराष्ट्र बनला कोरोनाचा हॉटस्पॉट; पुणे, मुंबई, नागपूरमध्ये वेगानं फैलाव

आम्हाला आमचे हित कसे जपायचे हे चांगलं माहिती आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम करत राहू, पण त्यात आमचे हित असले पाहिले. आम्ही त्या अटींवर काम करु ज्या आम्हाला योग्य वाटतात. त्यांना त्या मान्य करुनच आमच्यासोबत सहकार्य करावे लागेल, असंही पुतीन म्हणाले. बायडेन यांच्या वक्तव्यानंतर रशियाकडून तिखट प्रत्युत्तर आलं आहे. पण, आपल्या राजदुताला परत बोलावण्यापलीकडे रशिया गेलेली नाही. तसेच बायडेन यांनी त्यांच्या 'किलर' वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी रशियाने केली आहे. अमेरिकेने यास नकार दिलाय. 

३५ वर्षांपूर्वी झाली होती पहिली शेतकरी आत्महत्या, आज एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन

दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करणे, प्रतिस्पर्धी अॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करणे आणि अनेक विरोधकांना संपवणे, साबयर अटॅक करणे असे अनेक आरोप रशियावर करण्यात आले आहेत. याविषयी बोलताना बायडेन म्हणाले होते की, 'पुतिन यांना याची किंमत चुकवावी लागेल. तसेच आपल्या विरोधकांना संपवणारे पुतिन एक 'किलर' आहेत'. रशियाने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत अमेरिकेतील आपल्या राजदूताला मॉस्कोमध्ये चर्चेसाठी बोलावले आहे. 

loading image