esakal | सौदीचा पाकला दणका तर भारताला दिवाळी भेट; नकाशा प्रकरणात घेतला 'यू टर्न'
sakal

बोलून बातमी शोधा

 saudi arabia, saudi arabia removes pok and gilgit baltistan,pakistan map

 सऊदी अरबियाने 21-22 नोव्हेंबरला जी-20 शिखर संम्मेलनात नोटेवर जारी केलेल्या नकाशामुळे वाद निर्माण झाला होता. एक 20 रियाल (सऊदी चलन) च्या बँक नोटवर छापलेल्या नकाशामध्ये गिलगिट-बाल्टिस्तान आणि कश्मीरला पाकिस्तानच्या हद्दित दाखवण्यात आले होते.

सौदीचा पाकला दणका तर भारताला दिवाळी भेट; नकाशा प्रकरणात घेतला 'यू टर्न'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: सौदी अरब (Saudi Arabia) ने पाकिस्तान (Pakistan) च्या हद्दीतील काश्मिर (PoK) आणि गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan) प्रांत पाकिस्तानच्या नकाशातून हटवला आहे. सौदीचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का समजला जात असून त्यांनी भारताला दिवाळी भेट दिल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात रंगत आहे. यापूर्वी पाकिस्तानने भारताचा अविभाज्य घटक असलेल्या प्रांताला पाकिस्तानमध्ये दाखवले होते. चलानावरील नकाशाबाबात घडलेल्या प्रकारावर भारताने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सौदीनं यात पुन्हा बदल केल्याचे वृत्त आहे.   

बँक नोटवर जारी केला होता नकाशा 

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार,  सौदी अरबियाने 21-22 नोव्हेंबरला  जी-20 शिखर संम्मेलनात नोटेवर जारी केलेल्या नकाशामुळे वाद निर्माण झाला होता.  एक 20 रियाल (सऊदी चलन) च्या बँक नोटवर छापलेल्या नकाशामध्ये गिलगिट-बाल्टिस्तान आणि कश्मीरला पाकिस्तानच्या हद्दित दाखवण्यात आले होते. चलनावरील नकाशामध्ये सुरुवातीला गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओके (पाक व्याप्त काश्मिर) हे प्रांत पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर यात बदल करण्यात आला आहे. 

चिडलेल्या युट्यूबरने अडीच कोटींची मर्सिडीज दिली पेटवून; VIDEO VIRAL

अमजद अयूब म्हणालेच भारतासाठी दिवाळी भेट  

सौदी अरेबियाने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानला अपमानित करणारणा असल्याचे मत पीओके कार्यकर्ता अमजद अयूब मिर्झा (Amjad Ayub Mirza) यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.  'पाकिस्तानच्या नकाशातून  गिलगिट-बाल्टिस्तान आणि काश्मिर हटवून भारतासाठी सौदीनं दिवाळी भेट दिली आहे.' असे ट्विट त्यांनी केले आहे.  

विधानसभा निवडणूक घेण्यावर भारताने घेतला होता आक्षेप  

भारत सरकारने गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan) मध्ये पाकिस्तान द्वारा विधानसभा  निवडणूक घेण्याचा विरोध दर्शवला होता.  गिलगिट-बाल्टिस्तानसह जम्मू-काश्मीर आणि लद्दाख हा भारताचा अविभाज्य घटक आहे, असे निवेदन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आले होते. 15 नोव्हेंबरला गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाककडून विधानसभा निवडणुका घेण्यात येणार असल्याच्या वृत्ताचा दाखला घेत भारताने यावर आक्षेप नोंदवला होता.  

हे वाचा - नवजात बाळाचा मृतदेह सापडल्याने महिलांना विमानातून उतरवून केली तपासणी

पाकिस्तानने भारतीय प्रदेश आपला असल्याचा केला होता दावा 

पाकिस्तानमधील इमरान खान सरकारने  (Imran Khan Govt) काही दिवसांपूर्वीच राजकीय नकाशा प्रदर्शित केला होता. ज्यात  जूनागढ, सर क्रीक आणि गुजरातमधील मनावादार सहित जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमधील काही भाग पाकमध्ये असल्याचे दाखवण्यात आले होते. मोदी सरकारने जम्मू काश्मिरमधील कलम 370 हटवण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना पाकने हा प्रकार केला होता.