30 वर्षांपासून टॉयलेटमध्ये बनवत होते समोसे; प्रशासनाची कारवाई

सौदी अरेबियात समोसा आणि इतर पदार्थ टॉयलेटमध्ये बनवताना आढळल्याप्रकरणी एका रेस्टॉरंटवर बंदी घालण्यात आली आहे.
Samosa
SamosaSakal

रियाध : सौदी अरेबियात समोसा आणि इतर पदार्थ टॉयलेटमध्ये बनवताना आढळल्याप्रकरणी एका रेस्टॉरंटवर बंदी घालण्यात आली आहे. मागच्या ३० वर्षापासून टॉयलेटमध्ये पदार्थ बनवत असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार गल्फ न्यूजने हे वृत्त दिले आहे. जेद्दाह नगरपालिकेने त्यांना मिळालेल्या माहितीवरुन एका निवासी इमारतीतील रेस्टॉरंटवर छापा टाकल्याची माहिती आहे.

Samosa
माझ्या नावाने बनावट सहीची FIR; कारवाई न झाल्यास राज्यपालांना भेटणार

जेद्दाह नगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार, त्यांना या रेस्टॉरंटमध्ये असुविधा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून यावर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर सदर रेस्टॉरंटमध्ये टॉयलेटमध्ये जेवन बनवत असल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर भोजनालयात मांस आणि चीज यांसारख्या कालबाह्य खाद्यपदार्थांचा वापर केला जात असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही दोन वर्षांपूर्वीचे पदार्थ आढळले असून त्या ठिकाणी किडे आणि उंदीरही आढळून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे हेल्थकार्ड नसल्याचं समोर आलं आहे. हे कायद्याचं उल्लंघन आहे असं सांगत यावर कारवाई करण्यात आली असून रेस्टॉरंट बंद करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

Samosa
'या' लोकांमुळे पसरतो कोरोना; अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर

दरम्यान स्वच्छतेच्या कारणावरुन रेस्टॉरंट बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्या अगोदर जानेवारीमध्ये एक प्रसिद्ध शॉरमा रेस्टॉरंटमध्ये शॉरमा स्कीवरवर उंदीर आढळल्याने सदर रेस्टॉरंट बंद करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या रेस्टॉरंटमध्ये आढळलेल्या उंदराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. रेस्टॉरंटमध्ये उंदीर आढळल्याने लोकांकडून यावर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करत हे रेस्टॉरंट सील करण्यात केलं होतं.

त्यानंतर सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी 2833 रेस्टॉरंटवर धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये ४३ रेस्टॉरंटमध्ये अशा असुविधा आढळल्या होत्या आणि त्यातले 26 रेस्टॉरंट बंद करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com