Serbia Parliament Esakal
ग्लोबल
Serbia : खासदारांनी संसदेला बनवलं युद्धभूमी, सत्ताधाऱ्यांवर स्मोक ग्रेनेड अन् अश्रूधुराचे गोळे फेकले; VIDEO VIRAL
Serbia : खासदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि मारहाणीची घटना घडली. संसदेतलं दृश्य एखाद्या युद्धभूमीवर बॉम्बस्फोट झाल्यासारखं होतं.
युरोपियन देश सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. एका पाठोपाठ एक स्मोक ग्रेनेड फेकले आणि अश्रूधुराचे बॉल फेकले. यामुळे संसदीय अधिवेशनात गोंधळ उडाला. खासदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि मारहाणीची घटना घडली. संसदेतलं दृश्य एखाद्या युद्धभूमीवर बॉम्बस्फोट झाल्यासारखं होतं. सगळीकडे धूर पसरला होता आणि खासदारांकडून घोषणाबाजी केली जात होती. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सत्ताधारी खासदारांच्या बाकांवर आणि काही खासदारांच्या अंगावर अश्रूधुराचे बॉल फेकले.

