esakal | जल्लोषात तालिबानचा हवेत गोळीबार, लहान मुलांसह अनेकजण ठार
sakal

बोलून बातमी शोधा

जल्लोषात तालिबानचा हवेत गोळीबार, लहान मुलांसह अनेकजण ठार

जल्लोषात तालिबानचा हवेत गोळीबार, लहान मुलांसह अनेकजण ठार

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: पंजशीर (Panjshir) जिंकल्याच्या आनंदामध्ये तालिबानने (Taliban) शुक्रवारी रात्री काबुलमध्ये (kabul) हवेत गोळीबार (firing) केला. तालिबानने केलेल्या या सेलिब्रेशन फायरिंगची किंमत अनेक निष्पाप जीवांना चुकवावी लागली आहे. तालिबानने हवेत केलेल्या या गोळीबारामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी सुद्धा झाले आहेत. 'अस्वाका' या स्थानिक अफगाण वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

तालिबानने पंजशीऱ खोऱ्यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केल्यानंतर काबुलमध्ये शुक्रवारी हवेत गोळ्यांच्या फैरी झाडल्याचे आवाज ऐकू आले. पंजशीर खोऱ्यात नॅशनल रेसिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान (NRFA) आणि तालिबानमध्ये घनघोर लढाई सुरु आहे. पंजशीर जिंकल्याचा तालिबानचा हा दावा NRFA फोर्सने फेटाळून लावलाय. हवेतील गोळीबाराच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटो, व्हिडीओमध्ये नागरिक त्यांच्या जखमी नातेवाईकांना काबुलच्या रुग्णालयात घेऊन जात असल्याचे दिसत आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलेय.

हेही वाचा: मालाड: महिलेला टॉयलेटमध्ये डांबून लुटलं घर

"आम्ही संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं आहे. त्रास देणाऱ्यांचा पराभव झाला आहे. पंजशीर आता आमच्या नियंत्रणाखाली आहे" असं तालिबानच्या कमांडरने म्हटलं आहे.

हेही वाचा: अदर पुनावालांनी मुंढव्यात 13 फ्लोअरसाठी मोजले 464 कोटी

रेसिस्टन्स फोर्सचा नेता अहमद मसूदने पंजशीर तालिबानच्या ताब्यात गेल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं. पाकिस्तानी मीडियामध्ये पंजशीर तालिबानने जिंकल्याचं वृत्त येतय. पण ते चुकीचं आहे, असं अहमद मसूद म्हणाला. त्याच्या नेतृत्वाखाली पंजशीरमध्ये NRFA तालिबान विरोधात लढत आहे. नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या पंजशीरमध्ये तालिबानला कधीही विजय मिळवता आलेला नाहीय. रशियन फौजा सुद्धा पंजशीर खोऱ्यात निष्प्रभ ठरल्या होत्या.

loading image
go to top