चाकू हल्ल्याची विचित्र घटना; पोलिसही पडलेत गोंधळात

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

शहरातील बरेच भाग खाली करण्यात आली आहेत. लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच या भागात नाकाबंदीही केली आहे.

बर्मिंघम:  ब्रिटनमधील बर्मिंघममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. काल रात्री याभागात बऱ्याच ठिकाणी चाकूहल्ले झाले आहेत. अज्ञातांनी केलेल्या चाकूहल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत. ही घटना अचानक घडली असून ब्रिटीश पोलिसांनी या घटनेला 'मोठी विचित्र घटना' असं म्हटलं आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 12:30 च्या सुमारास बर्मिंघममध्ये चाकू हल्ला झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्यापाठोपाठ अन्य काही भागात अशाच प्रकारच्या घटना झाल्याचे समजले. या घटनेला एक मोठी घटना घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी त्यांच्या निवेदनात दिली आहे. 

पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक उतरले रस्त्यावर

वेस्ट मिडलँडमधील पोलिसांनी या हल्ल्याबद्दलची माहिती देताना असं सांगितलं की, "आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या चाकूहल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत, परंतु किती लोक जखमी झाले? आकडा नेमका किती आहे? आणि त्यांची स्थिती काय? यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही. सर्व आपत्कालीन सेवा एकत्र काम करत असून जखमींना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत."

"पंतप्रधान मोदी एक महान नेता, भारतीय-अमेरिकी मलाच मत देतील"

ब्रिटनमधील एका टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित झालेल्या फुटेजमध्ये दिसत आहे की, शहरातील बरेच भाग खाली करण्यात आली आहेत. लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच या भागात नाकाबंदीही केली आहे. सर्व पोलिस फॉरेन्सिक सूट परिधान करुन काम करताना दिसत आहेत.  वेस्ट मिडलँड पोलिसांनी सांगितले की, "खरोखर या भागात नेमकं काय घडलं, चाकूहल्ले कशासाठी झाले आहे हे शोधण्यासाठी काम चालू आहे त्यासाठी थोडा वेळ लागेल. सुरुवातीच्या टप्प्यावर अपघाताचे कारण सांगणे योग्य नाही."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Several people injured in knife incident in Birmingham police say big crime

Tags
टॉपिकस