

Summary
शेख हसीना यांना बांग्लादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मानवतेविरुद्धचे गुन्हे सिद्ध करून मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे.
त्या सध्या भारतात आहेत, त्यामुळे न्यायालयीन आदेश प्रत्यक्षात अंमलात आणणे आव्हानात्मक आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात २०१३ मध्ये प्रत्यार्पण करार आहे, पण तो “राजकीय गुन्हे” असल्यास नकाराचा तरतूद आहे.
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये गोळीबार झाला आणि हिंसाचार उफाळलला यात शेकडो विद्यार्थी ठार झाले. यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार कोसळले त्यांना देशातून पलायन करावे लागले आणि भारतात आश्रय घ्यावा लागला. सध्या भारतात राहणाऱ्या शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने (आयसीटी) शेख हसीना यांना शिक्षा सुनावली आहे. पण भारत शेख हसीना यांचे बांगलादेशकडे प्रत्यार्पण करेल का? या शिक्षेचा भारतात काही कायदेशीर परिणाम होईल का? संयुक्त राष्ट्र संघ या निर्णयाला मान्यता देईल का? आणि शेख हसीना यांचे जीवन आता भारताच्या निर्णयावर अवलंबून आहे का? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत याविषयी विस्ताराने जाणून घेऊया.