अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 8 जण ठार; हल्लेखोराने केली आत्महत्या

फेडेक्स सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने नंतर स्वतः आत्महत्या केली आहे.
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 8 जण ठार; हल्लेखोराने केली आत्महत्या
संग्रहित
Updated on

नवी दिल्ली- इंडियाना पोलिस येथे फेडेक्समधील एका केंद्रावर गुरुवारी 8 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील फेडेक्स सेंटरवर गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळाली होती, असे पोलिस प्रवक्ते जिनी कुक यांनी सांगितले. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हाही गोळीबार सुरु होता. दरम्यान, फेडेक्स सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने नंतर स्वतः आत्महत्या केली आहे.

अनेकांना गोळी लागली आहे. परंतु, पोलिसांनी जखमींची संख्या सांगितलेली नाही. हल्लेखोराने आत्महत्या केली आहे. आता तेथील लोकांना कोणताच धोका नसल्याचे कुक यांनी सांगितले. अचानक गोळ्यांचा आवाज येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक बंदूकधारी व्यक्ती अंदाधुंद गोळीबार करताना दिसला, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 8 जण ठार; हल्लेखोराने केली आत्महत्या
City Bank भारतातील गाशा गुंडाळणार? काय आहे कारण

ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यापूर्वी मागील महिन्याच्या अखेरीस दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका कार्यालयाच्या इमारतीत एका मुलासह चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 22 मार्चला कोलोरा़डो येथील बोल्डरमधील एका सुपर मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 8 जण ठार; हल्लेखोराने केली आत्महत्या
मशिदीमध्ये नमाज पठण टाळा, मुंबईतील मुस्लिम डॉक्टरांचा सल्ला

त्यानंतर आठवड्यातच एका मारेकऱ्याने अटलांटा, जॉर्जिया येथील एका स्पामध्ये आशियाई वंशाच्या सहा महिलांसमवेत 8 जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. अमेरिकेत सुमारे 40 हजार जणांचा गोळीबारात मृत्यू होतो.

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 8 जण ठार; हल्लेखोराने केली आत्महत्या
राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com