'लोगो'त काय आहे? फेसबुकने लोगोमध्ये केला बदल!

टीम ई-सकाळ
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियामधील फेसबुक, इन्स्टाग्राम हे अ‍ॅप्स आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर हे मेसेजिंग अ‍ॅप्स फेसबुक कंपनीच्या मालकीची आहेत.

सोशल मीडियातील आघाडीची नेटवर्किग साईट असलेल्या फेसबुक या कंपनीने आपला नवीन लोगो बुधवारी (ता.6) लाँच केला. या नव्या लोगोचं वैशिष्ट्य म्हणजे या लोगोमध्ये लिहलेलं फेसबुकची इंग्रजी अक्षरे ही कॅपिटलमध्ये लिहिली आहेत. तसेच ही सर्व अक्षरे वेगवेगळ्या रंगातही आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नवा लोगो GIF फॉरमॅटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

फेसबुकचे मुख्य विपणन अधिकारी ऐंटोनिओ लुसियो यांनी याबाबची माहिती प्रसिद्ध केली. ते म्हणाले, नवीन लोगो प्रसिद्ध करण्यामागे कारणही तसेच आहे. कारण, अनेक कंपन्यांमध्ये फेसबुकची मालकी आहे. त्यामुळे इतर कंपन्या आणि फेसबुक कंपनी यामध्ये साम्य आढळू नये, यासाठी नवा लोगो लाँच करण्यात आला आहे. 

ते पुढे म्हणाले, सोशल मीडियामधील फेसबुक, इन्स्टाग्राम हे अ‍ॅप्स आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर हे मेसेजिंग अ‍ॅप्स फेसबुक कंपनीच्या मालकीची आहेत. जे युजर्स फेसबुक कंपनीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या सेवा वापरतात, त्यांनादेखील आपण नक्की कोणत्या कंपनीची सेवा वापरत आहोत, याची माहिती मिळेल. तसेच या लोगोचा वापर कंपनीच्या मार्केटिंग आणि प्रोडक्ट विभागातही वापरला जाणार आहे.

आतापर्यंत ‘फेसबुक’चा लोगो आतापर्यंत इतर फेसबुक कंपन्यांसाठी वापरला जात होता. मात्र, यापुढे फेसबुक कंपनी GIF फॉरमॅटमधील नवा लोगो वापरणार आहे. फेसबुक अ‍ॅपसाठी वापरला जाणारा जुना लोगो हा यापुढेही कायम राहणार आहे. फेसबुक कंपनी आणि फेसबुक अ‍ॅप यामध्ये नव्या लोगोमुळे वेगळी ओळख निर्माण होणार आहे. 

हा लोगो फक्त लाँच करण्यात आला असून त्याचा अधिकृत वापर करण्यास अजून सुरवात झालेली नाही. मात्र, काही आठवड्यांत ते सर्व युजर्सना वापरता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम या बरोबरच पोर्टल, ऑक्युलस, वर्कप्लेस आणि कॅलिब्रा (‘लिब्रा’ डिजिटल करन्सी) या डिजीटल सुविधाही पुरवते.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- ऑल इज नॉट वेल; का केलं युवीने विराटसाठी असं ट्विट?

- पिलाला लागला शॉक, माकडाची आई त्याला घेऊन पोहोचली दवाखान्यात..

- INDvsBAN : असं शतक करणारा रोहित उद्या ठरणार पहिला भारतीय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social networking company Facebook launched its new logo