
दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकून एका रहिवाशी भागातच बॉम्ब फेकले. एक दोन नव्हे तर तब्बल ८ बॉम्ब फेकण्यात आले. यात ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी एका लष्करी अभ्यासाअंतर्गत हवाई दलाच्या केएफ१६ लढाऊ विमानातून ८ बॉम्ब फेकण्यात आले. ही घटना उत्तर कोरियाला लागून असलेल्या पोशिओन शहरात झाली.