
दक्षिण कोरियात जेजू एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात होऊन १७९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २९ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. या विमान दुर्घटनेचं गूढ आता वाढलं आहे. दुर्घटनेच्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आलीय. दक्षिण कोरियाच्या परिवहन मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, दुर्घटनेआधी चार मिनिटापूर्वी विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद पडला होता. यामुळे शेवटच्या चार मिनिटांचं रेकॉर्डिंग ब्लॅक बॉक्समध्ये नाही.