
दक्षिण कोरियात रविवारी सकाळी मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर विमान घसरून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १७९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. धावपट्टीवरून घसरल्यानंतर विमान बाउंड्री फेसला जाऊन धडकलं. यानंतर विमानाला आग लागली. या दुर्घटनेत फक्त दोघे बचावले आहेत.