स्पेन बुडाला दुःखाच्या सागरात; इतिहासातील सर्वांत मोठा दुखवटा

यूएनआय
शुक्रवार, 29 मे 2020

एकुण रुग्णांची युरोपातील सर्वाधिक संख्या असलेल्या स्पेनमध्ये दहा दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा बुधवारपासून सुरु झाला. कोरोनाला बळी पडलेल्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरातील राष्ट्रध्वज पाच जुनपर्यंत अर्ध्यावर खाली राहतील. या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील हा सर्वाधिक कालावधीचा दुखवटा असेल.

माद्रिद : एकुण रुग्णांची युरोपातील सर्वाधिक संख्या असलेल्या स्पेनमध्ये दहा दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा बुधवारपासून सुरु झाला. कोरोनाला बळी पडलेल्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरातील राष्ट्रध्वज पाच जुनपर्यंत अर्ध्यावर खाली राहतील. या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील हा सर्वाधिक कालावधीचा दुखवटा असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्पेनमध्ये 1978 मध्ये लोकशाहीची स्थापना झाली. त्यानंतर इतका मोठ्या कालावधीचा दुखवटा पाळला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्चपासून लॉकडाउन लागू केलेल्या व एकूण चार वेळा ते वाढविलेल्या स्पेनमधील महामारी इटलीपेक्षाही तीव्र ठरली. सुरवातीला संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या इटलीत 31 मार्च रोजीच दुखवटा पाळण्यात आला. चीनमध्ये चार एप्रिल रोजी, तर अमेरिकेत याच आठवड्यात आदरांजली अर्पण करण्यात आली. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅंचेझ यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार सार्वजनिक इमारती तसेच नौदलाच्या जहाजांवरील ध्वज अर्ध्यावर आणण्यात आले. या कालावधीत "राजे फिलीपे सहा' यांच्या अध्यक्षतेखाली पवित्र स्मृती समारंभ आयोजित केला जाईल. स्पेनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला. एकूण रुग्णांच्या संख्येत त्यांचे प्रमाण 20 टक्के आहे. 

अफगाणिस्तान-तालिबान आणि भारत

विरोधकांची टीका; जनताही सहमत 
पंतप्रधान पेड्रो सॅंचेझ यांच्या नेतृत्वाखालील डाव्या विचारसरणीच्या संयुक्त आघाडी सरकारने मृतांना आदरांजली अर्पण न केल्यामुळे विरोधी पक्षांनी टीका केली होती. मृतांची संख्या राजकीया वादाचा विषय ठरला होता. जनताही याबाबतीत सहमत होती. माद्रिदमधील कोंचिता हर्नांडेझ या 77 वर्षीय वृद्धेने सांगितले की, "सरकारने फार आधीच दुखवटा जाहीर केला असता तर ते अर्थपूर्ण ठरले असते. कारण निर्बंध पाळून आम्ही घरी थांबण्यात तेव्हा अर्थ राहिला असता, पण हा निर्णय अजूनही उचित ठरतो. ' तिचे पती आगुस्टीन अल्वारेझ म्हणाले की, मृतांच्या आकड्याची तुलना केवळ युद्धातील मनुष्यहानीशीच होऊ शकेल. 

युरोप नाही, अमेरिका नाही, कोरोनाचं ब्राझीलमध्ये थैमान

स्पेनमधील मृतांमध्ये दहा पैकी आठ जणांचे वय 70 पेक्षा जास्त हरोते. आज आपल्याला दिसत असलेल्या देशाची बांधणी त्यांनी केली. त्यांचे जीवन खडतर परिस्थितीत आणि अचानक अर्धवट राहिल्यामुळे मित्रमंडळी, कुटुंबियांना तीव्र वेदना होत आहेत. 
- मारीया जीझस मॉंटेरो, सरकारी प्रवक्त्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spain 10 day mourning for covid 19 victims