समुद्रकिनारी पर्यटकांचे अश्लील कृत्य; स्पेनमध्ये होतेय चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्रकिनारी पर्यटकांचे अश्लील कृत्य; स्पेनमध्ये होतेय चर्चा
समुद्रकिनारी पर्यटकांचे अश्लील कृत्य; स्पेनमध्ये होतेय चर्चा

समुद्रकिनारी पर्यटकांचे अश्लील कृत्य; स्पेनमध्ये होतेय चर्चा

प्रवास सगळ्यांच्या आवडीचा असतो. त्या प्रदेशात हिंडून तिथली पर्यटनस्थळे, तिथला इतिहास जाणून घेणे प्रत्येकाला आवडते. पण काहीवेळा पर्यंटक तो परिसर आपल्या वागण्याने, काही कृतींनी अगदी घाण करतात. अशावेळी त्या त्या देशांमधल्या ओव्हर टुरिझमला दोषी धरले जाते.

ओव्हर टुरिझमसाठी ऐतिहासिक शहरांची गळचेपी करणे, जगप्रसिद्ध स्थळांच्या परिसरात वाईट वर्तन करणे तसेच स्थानिक लोकांना त्रास देणे अशा काही गोष्टींचा समावेश होतो.  सध्या युरोपमधील समुद्रकिनारे आणि निसर्ग हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जाते आहे. याचे कारण सेक्स करणाऱ्या पर्यंटकांचा होणारा त्रास. 

ग्रॅन कॅनरिया या स्पॅनिश बेटावरील ड्युनास डे मास्पालोमास स्पेशल नेचर रिझर्व्ह, तसेच समुद्रकिनारी असलेल्या लाईटहाऊसच्या (दीपगृह) मागे उगवणाऱ्या जंगली वाळूच्या ढिगाऱ्यांसाठी ओळखले जाते. या बेटावरील हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. 1982 पासून येथील ड्यून्सना कायद्याने संरक्षण मिळाले आहे. येेथे आफ्रिका आणि युरोप दरम्यान स्थलांतर करणारे पक्षी येत असतात. पण आता पर्यटकांना येथे फिरण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा: India China conflict : भारतीय हद्दीत चीन अतिक्रमण वादावर पडदा!

2018 साली झालेल्या अभ्यासावरून निष्कर्ष

जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट मधील एक नवीन पेपर प्रसिद्ध झाला आहे. त्यात सेंड,.(वाळू), सुर्य, समुद्र आणि सेक्स तेही अनोळखी व्यक्तीसोबत हे पाच एस या संरक्षित किनारपट्टीच्या ड्युनफील्डवरील पर्यावरणाला बाधा पोहोचवत असल्याचे प्रथमच दिसते आहे.

या समुद्रकिनाऱ्याचे एकूण दोन चौरस मैल क्षेत्रफळ असून त्यात, प्रामुख्याने "झुडुप आणि दाट झाडे" आणि नेबखास - वनस्पतींभोवती उगवलेले ढिगारे यांचा मोठा समावेश आहे. संशोधकांनी मे 2018 साली अभ्यास केला होता. त्या कालावधीत स्थानिक गे प्राईड उत्सव होता. अभ्यासात संशोधकांनी समुद्रकिनारी 298 सेक्स स्पॉट्स शोधून काढले. या दरम्यान केलेल्या पर्यटकांनी केलेल्या सेक्समुळे आणि क्रूझर ट्रॅम्पलिंगचा परिणाम नेबखासवर तर झालाच पण आठ मूळ वनस्पती प्रजातींना त्याचा सर्वाधिक फटका बसला. त्यापैकी तीन प्रजाती स्थानिक असल्याचे त्यांना आढळले.

हेही वाचा: भारतीय वंशाच्या चार मुलांना रस्त्यात सोडून हल्लेखोरांचं पलायन

वाळूवर केल्या स्वतच्या जागा - येथे आलेले पर्यटक झाडे तुडवतात. स्वतःचे नेस्ट बांधण्यासाठी झाडांचा, वाळूचा उपयोग करून तेथे कुंपण बांधतात. त्यात सिगारेट, कंडोम, टॉयलेट पेपर, वाईप्स, कॅनचा कचरा भरपूर टाकल्याचे आढळले. तसेच टॉयलेट करण्यासाठी ते वाळूच्या ढिगाऱ्याचा वापर करत असल्याचेही आढळले. सेस्क स्पॉट जितक्या दुर्गम स्थानी असेल तितका त्याचा वापर जास्त केला गेला होता. तसेच त्यात जास्त कचरा टाकला गेल्याचे संशोधकांचे लक्षात आले. अधिकारी काही मोठ्या भागात कचऱ्याच्या पिशव्या सोडत असले तरी त्या भरलेल्या होत्या, असेही आढळले. तसेच पर्यटकांना पूर्ण प्रतिबंध असलेल्या वाळूच्या अपवर्जन झोनमध्येही 56 सेक्स स्पॉट आढळले.

पर्यावरणाला मोठा फटका 

अभ्यासानुसार, पर्यटकांच्या या वागणुकीमुळे रिझर्व्ह एरिया असलेल्या पर्यावरणीय भागाला मोठा फटका बसला आहे. तो भाग जवळपास नष्ट होण्याचा मार्गावर आहे. तर, ग्रॅन कॅनरियाची ओळख असलेले मोठे सरडे कंडोम खाल्ल्याने मरण पावले, असे पॅट्रिक हेस्प या अहवालाच्या लेखकांपैकी एक, द कॉन्व्हर्सेशनच्या लेखात म्हटले आहे. वर्षभरात 14 दशलक्ष पर्यटक येथे भेट देतात., ग्रॅन कॅनरिया हे समलिंगी पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटन स्थळ आहे, येथे  यूएस, यूके आणि जर्मनीचे पर्यटक येतात. कोस्टल डून सिस्टम्स सागरी लँडस्केपचा भाग आहेत, परंतु जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा वापर केला गेला आहे

loading image
go to top