
झीलिया यांचा जन्म 1914 मध्ये रिओ दी जेनेरिओमध्ये झाला होता. 1918 ते 1920 या काळात स्पॅनिश फ्लू जगभरात पसरला होता. त्यावेळी फ्लूपासून वाचवणारी कोणतीच लस नव्हती.
रिओ दी जेनिरिओ - जगात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घातला आहे. पण आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी महामारी म्हणून स्पॅनिश फ्लूचा उल्लेख केला जातो. 100 वर्षांपूर्वी 1918 -20 या काळात स्पॅनिश फ्लूने जगात हाहाकार माजवला होता. स्पॅनिश फ्लूने ब्राझीलसह जगात 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. या साथीत कोणतीही लस नसताना एक आजी वाचली होती. त्यावेळी 5 ते 6 वर्षे वय असलेल्या आजींनी कोरोनाची प्रतिबंधक लस टोचून घेतली.
झीलिया दी कार्व्हेलो मोर्ले असं आजीचं नाव असून सध्या त्यांचं वय 106 वर्षे इतकं आहे. बुधवारी झीलिया आजींनी कोरोनाची लस टोचून घेतली तेव्हा स्पॅनिश फ्लूची आठवण सांगितल्या. झीलिया यांचा जन्म 1914 मध्ये रिओ दी जेनेरिओमध्ये झाला होता. 1918 ते 1920 या काळात स्पॅनिश फ्लू जगभरात पसरला होता. त्यावेळी फ्लूपासून वाचवणारी कोणतीच लस नव्हती. त्याबद्दल सांगताना आजी म्हणतात की, संपूर्ण ब्राझील फ्लूच्या विळख्यात सापडला होता. कित्येक लोकांचा मृत्यू झाला होता. मी ते विसरू शकत नाही.
हे वाचा - 'ठोको ताली'; बायडेन यांच्या भाषणामागे भारतीयाचा हात!
ब्राझीलला कोरोनाचा फटका
ब्राजीलसह जगातील अनेक देशांमध्ये सर्वात आधी 100 वर्षांच्या आसपास वय असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. ब्राझीलमध्ये मंगळवारी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. याठिकाणी चीनच्या सिनोवेकने तयार केलेली लस टोचण्यात येत आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका बसलेल्या देशांमध्ये ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. झीलिया यांचे डॉक्टर पॉलो सेसर यांनी सांगितलं की झीलिया यांच्या आई वडिलांनासुद्धा फ्लू झाला होता.
छप्पर फाड के! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिळतो एवढा पगार; तरीही काहींनी नाकारलं वेतन
स्पॅनिश फ्लूवेळी नव्हतं औषध
झीलिया 6 ते 7 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की,'लोक रस्त्यावर मरून पडत आहेत. त्यावेळी कोणत्याही प्रकारची औषधे नव्हती. किती लोक मरत होते त्याचं मोजमाप नव्हतं.' झीलिया जिथं राहतात तिथंही कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अद्याप वृद्धांच्या प्रकृतीची चिंता डॉक्टरांना आहे. झीलियाचे डॉक्टर म्हणतात की, आता आम्हाला थोडी शांती मिळेल. लस आल्यामुळे वृद्धांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होईल. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक सहकाऱ्यांना गमावलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.