
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे भाषण लिहिणारे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक विनय रेड्डी हे ओहिओच्या डायटन येथे शिकले.
वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन विराजमान झाले असून त्यांनी संपूर्ण प्रचारात अतिशय काळजीपूर्वक शब्दांचा वापर केला होता. बुधवारी (ता.२०) बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर सुमारे २० मिनिटांच्या भाषणाने अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे मन जिंकले. बायडेन यांनी आपल्या भाषणातून एकतेचा संदेश दिला. या संदेशामागे भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकाचा वाटा आहे.
- छप्पर फाड के! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिळतो एवढा पगार; तरीही काहींनी नाकारलं वेतन
तेलंगणशी नाते असणारे सी. विनय रेड्डी असे त्यांचे नाव असून त्यांनी संपूर्ण प्रचार अभियानात बायडेन आणि कमला हॅरिस यांची भाषणे लिहिली. एवढेच नाही तर २०१३ ते २०१७ यादरम्यान ज्यो बायडेन हे उपाध्यक्ष असतानाही विनय रेड्डी हे त्यांच्याशी जोडलेले होते. अध्यक्षाचे भाषण लिहिण्यासाठी रेड्डी यांनी नियुक्ती करण्यात आली आणि ते पहिले भारतीय अमेरिकी नागरिक ठरले. बायडेन यांचे अध्यक्षीय नात्याने होणारे भाषण गेल्यावर्षी नोव्हेंबरपासूनच लिहले जात होते. यात एकता, निष्पक्षता, आशावाद यासारख्या मुद्द्यांचा समावेश केला जात होता.
- बायडन बंपर धमाका; 5 लाख भारतीयांना नागरिकत्व, मुस्लिमांवरील निर्बंध हटवण्याच्या हालचाली
शपथविधीनंतर बायडेन यांनी आपल्या भाषणात ‘आजचा दिवस अमेरिकेचा अन लोकशाहीचा आहे. एकीशिवाय देशात शांतता नांदू शकत नाही. आज आपण एका उमेदवाराच्या विजयाचा नाही, तर लोकशाहीच्या विजयाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस हा इतिहास आणि आशेचा आहे. जनतेच्या आशा-अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. श्वेतवर्णियांना श्रेष्ठ मानण्याच्या मानसिकतेला आणि अंतर्गत दहशतवादाला पराभूत करू. या लढाईत प्रत्येक अमेरिकी नागरिकांनी सामील व्हावे, अशी माझी इच्छा आहे, असा उल्लेख केला. या भाषणातून त्यांनी अमेरिकेचे भविष्यातील धोरण जगाला सांगितले. मात्र प्रत्यक्षात हे शब्द होते विनय रेड्डी यांचे आणि प्रत्येक शब्द हा मोलाचा ठरला आहे.
- पाकिस्तानचं मिसाईल परिक्षण फेल; यश मिळाल्याचा खोटा दावा
कोण आहेत विनय रेड्डी
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे भाषण लिहिणारे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक विनय रेड्डी हे ओहिओच्या डायटन येथे शिकले. त्यांनी आपले शिक्षण ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ येथून पूर्ण केले. त्यांनी बॅचलर डिग्री मियामी यूनिर्व्हर्सिटीतून मिळवली. रेड्डी यांचे कुटुंब तेलंगणातील हैदराबादपासून २०० किलोमीटर अंतरावरील पोथिरेडिपेटा गावाशी निगडित आहे. रेड्डी कुटुंबातील तीन भावंडात दुसरे असणारे विनय हे रेड्डी हे सध्या न्यूयॉर्क शहरात पत्नी आणि दोन मुलीसह राहतात.
- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)