३० वर्ष महिलेला परफेक्ट पार्टनर मिळालाच नाही, तरीही झाली प्रेग्नंट

३० वर्ष महिलेला परफेक्ट पार्टनर मिळालाच नाही, तरीही झाली प्रेग्नंट

इंग्लंडमधील एका महिलेने गर्भधारणेसाठी वेगळा मार्ग स्वीकारला.

इंग्लंडमधील एका महिलेने गर्भधारणेसाठी वेगळा मार्ग स्वीकारला. 'द मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत महिलेने तिच्या गरोदरपणाची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. डॅनियल बटल नावाच्या महिलेने सांगितले की, योग्य जोडीदाराच्या शोधात ती ३० वर्षे अविवाहित होती आणि अखेर तिने साथीदाराशिवाय गरोदर राहण्याचा निर्णय घेतला.

मातृत्व हे स्त्रीला मिळालेलं वरदान आहे. आई होणं, हा स्त्रीसाठी सर्वात मोठा आनंद असतो. मुलाचा जन्म होण्यासाठी त्यांच्यासाठी काय काय करायचं याची स्वप्नं त्यांनी पतीसोबत रंगवलेली असतात. मात्र इंग्लंडमधील एका महिलेने गर्भधारणेसाठी वेगळा मार्ग स्वीकारला. 'द मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत महिलेने तिच्या गरोदरपणाची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. डॅनियल बटल नावाच्या महिलेने सांगितले की, योग्य जोडीदाराच्या शोधात ती ३० वर्षे अविवाहित होती आणि अखेर तिने साथीदाराशिवाय गरोदर राहण्याचा निर्णय घेतला.

३० वर्ष महिलेला परफेक्ट पार्टनर मिळालाच नाही, तरीही झाली प्रेग्नंट
कॅन्सरपासून वाचण्यासाठी काय करायला हवं ? जाणून घेऊया

डॅनियल म्हणाला, 'मला आई होण्याचा आनंद अनुभवायचा होता. गेल्या काही वर्षांपासून मी परफेक्ट पार्टनर शोधत होते पण मला हवा तसा पार्टनर मिळेना. मी माझ्या मैत्रिणींसोबत विनोद करायचो की शुक्राणू दात्याच्या (स्पर्म डोनर) मदतीनेच मला गरोदर राहावे लागेल असे वाटते. मग नंतर मला वाटले की, या विनोदाचे वास्तवात रुपांतर करता येईल. मी फेसबुकवर अविवाहित मातांच्या गटात सामील झाले. मी माझी प्रजनन चाचणी (फर्टिलिटी टेस्ट) केली आणि प्रक्रिया पुढे नेली. या निर्णयात माझ्या कुटुंबाने मला साथ दिली.

मी शुक्राणू बँकेतून (स्पर्म बँक) एक तंदुरुस्त आणि स्मार्ट शुक्राणू दाता निवडला आणि नोव्हेंबर २०२० मध्ये IVF केले. त्याच्या वागण्यातूनही तो दाता खूप छान आणि काळजी घेणारा होता. माझी अंडी आयव्हीएफमध्ये फलित (एग्स फर्टिलाइज्ड) झाली. यानंतर ती माझ्या अंडाशयात ट्रान्सफर करण्यात आली.११ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, मी गरोदर असल्याची गुड न्यूज मला मिळाली. माझा विश्वासच बसत नव्हता. हा माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय होता.

३० वर्ष महिलेला परफेक्ट पार्टनर मिळालाच नाही, तरीही झाली प्रेग्नंट
विरुद्ध आहार : हेल्दी राहण्यासाठी 'हे' पदार्थ एकत्र खाणे टाळा

'मला चांगल्या प्रकारे गर्भधारणा झाली होती पण ३६ व्या आठवड्यात मला मधुमेह झाला आणि डॉक्टरांनी माझी प्रसूती लवकर करण्याचा निर्णय घेतला. अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले. माझ्या हातात माझं बाळ-माझा मुलगा रॉबिन होता. त्याला पहिल्यांदा पाहणे माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता, माझे कुटुंब आता पूर्ण झाले होते. मी सतत माझ्या मुलाकडे पाहत होते कारण ते माझे मूल आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझ्या मुलाला तो या जगात कसा आला हे मी नक्कीच सांगेन. मी एकटे राहण्याच्या माझ्या निर्णयाने खूप आनंदी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com