ब्रिटनच्या विद्यापीठांत कोरोना संसर्गाचा प्रसार

बोल्टन - कोविडच्या फैलावामुळे युनिव्हर्सिटी ऑफ बोल्टन येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विद्यार्थी अभ्यास करत आहेत.
बोल्टन - कोविडच्या फैलावामुळे युनिव्हर्सिटी ऑफ बोल्टन येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विद्यार्थी अभ्यास करत आहेत.

अठराशेहून अधिक विद्यार्थ्यांना लागण; न्यू कॅसल, नॉर्थम्ब्रियाचा समावेश
लंडन - ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाचा वेगाने प्रसार होत असून तीन विद्यापीठांतील किमान १८५३ विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती विद्यापीठ प्रशासनानेच दिली आहे. न्यू कॅसल विद्यापीठाच्या अधिपत्याखाली असलेले महाविद्यालयातील सुमारे १००३ विद्यार्थी आणि १२ कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचवेळी २ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ९४ जणांना बाधा झाल्याचे उघड झाले होते. याशिवाय गेल्या आठवड्यात नॉर्थम्ब्रिया यूनिव्हर्सिटी येथे ६१९ नवीन तर दरहॅम विद्यापीठात २१९ रुग्ण आढळून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रिटनमधील बहुतांश विद्यापीठांनी ऑनलाइन वर्गावर भर दिला असून काही महत्त्वाचे वर्ग वगळता उर्वरित अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवला जात आहे.

मात्र विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाधा होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे न्यू कॅसल विद्यापीठाने कॅम्पस सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत असल्याचे सांगितले. क्वारंटाइन असणारे विद्यार्थी ‘हेल्प पॅकेज’साठी पात्र असून त्यातर्गंत मानसिक आरोग्य राखण्यासाठी सल्ला आणि मदत, खाद्यपदार्थाचे कूपन्स, कपडे धुण्यासाठी मदत आदींचा समावेश आहे.

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता न्यू कॅसल आणि नॉर्थम्ब्रिया विद्यापीठांनी ऑनलाइनच्या मदतीने अभ्यासक्रम शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. डरहॅम विद्यापीठात गेल्या आठवड्यात २१९ नवीन रुग्ण आढळून आले होते.

डरहॅमच्या १७ महाविद्यालयापैकी दोन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परिसरातच थांबण्याचे आणि पुढील सात दिवस महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान, लीडस विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार ५५५ विद्यार्थी आणि तीन कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत. 

नवीन निर्बंधांची तयारी
ब्रिटनमध्ये सध्या कोरोना संसर्गाचा दुसरा टप्पा असून नवीन रुग्ण वाढत चालले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दैनंदिन व्यवहारावर निर्बंध आणण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात, संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याबरोबरच अनेक उपाय लागू केले आहेत. स्थानिक पातळीवर लॉकडाउन लागू करण्याच्यादेखील सूचना दिल्या आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com