
श्रीलंकेतील आर्थिक संकट थांबता थांबेना, औषधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई
कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकट आणखीन गडद होत चालले आहे. नागरिकांचा तीव्र विरोधामुळे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देशात लावलेली आणीबाणी अखेर मागे घेतली आहे. १ एप्रिल रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. नवीन मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने राजपक्षे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. पेट्रोल (Petrol), अन्नधान्य आणि आता औषधे यांची टंचाई श्रीलंकेत (Sri Lanka) निर्माण झाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार देशात आर्थिक संकट सुरु असताना औषधांची टंचाई जाणवत आहे. (Sri Lanka Financial Crisis Medicines Shortage In Country)
हेही वाचा: रशियाची नवीन युद्ध नीती ! युक्रेनने जर्मनीकडे मागितली शस्त्रे
एका औषधालयाच्या व्यवस्थापकाने सांगितले, की प्रिस्क्रिप्शन आणि नाॅन प्रिस्क्रिप्शन औषधांसह अनेक जीवनरक्षक औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकही मोठ्या प्रमाणावर औषधे खरेदी करुन आपल्याकडे ठेवत आहेत. श्रीलंकेच्या परकीय गंगाजळी प्रचंड घटली आहे. त्यामुळे इतर देशांकडून घेतलेले कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नाॅर्वे, इराक आणि ऑस्ट्रेलियातील दूतावास तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा: इतरांना फुकटचे सल्ले,अमेरिका मात्र रशियाकडून आयात करतय तेल
त्यामुळे विस्कटून चाललेली आर्थिक घडी बसवण्यासाठी नंदलाल वीरसिंघे यांच्याकडे केंद्रीय बँकेचे गर्व्हनरपद दिले गेले आहे. दुसरीकडे या देशात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरु आहे. हाॅटेल संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पर्यटन वाचविण्यासाठी निदर्शने केली. श्रीलंकेत पर्यटन हा मोठा उद्योग आहे. त्याला ही आर्थिक संकटाचा फटका बसला आहे.
Web Title: Sri Lanka Financial Crisis Medicines Shortage In Country
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..