श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; लोकांकडे दूध घ्यायलाही पैसे नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahinda Rajapaksa Resigns As Sri Lanka Prime Minister
श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; लोकांकडे दूध घ्यायलाही पैसे नाही

श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; लोकांकडे दूध घ्यायलाही पैसे नाही

नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेसाठी (Sri Lanka) एखाद्या वाईट स्वप्नासारखी आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका ज्या आर्थिक संकटात असल्याचं दिसत होतं, आता या संकटानं आणखी भयावह रूप धारण केलं असून श्रीलंका आता दिवाळखोर (Bankrupt) होण्याच्या मार्गावर आहे.

श्रीलंका हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तमिळनाडूच्या जवळपास निम्मा आहे. देशाची लोकसंख्या सुमारे अडीच लाख आहे. श्रीलंकेच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचं योगदान १० टक्क्यांहून अधिक आहे. कोरोना महामारीने पर्यटन व्यवसाय जवळपास उद्ध्वस्त केला आहे. त्यातसुद्धा चीनकडून कर्ज घेत देशाने आणखी मोठं संकट ओढावून घेतल्याचं दिसतंय. कारण चीन हा देश मुत्सद्देगिरीने कमकुवत देशांना कर्ज देतो आणि त्यांना अडकवतो. त्यानंतर त्या देशावर स्वतःची मतं आणि धोरण लादण्याचा प्रयत्न करतो. कर्जाची परतफेड न केल्याच्या बदल्यात श्रीलंकेला हंबनटोटा बंदर 100 वर्षांच्या लीजवर चीनला द्यावे लागलं आहे. तरीही श्रीलंकेला चिनचं फेडता आलेलं नाही.

हेही वाचा: अमेरिकेत कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावला

श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचं रुप आता दिवसेंदिवस आणखी भयावह होताना दिसतंय. महागाईने सर्व सीमा गाठल्या असून, खाण्यापिण्याच्या वस्तु खरेदी करणंही लोकांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसतंय. काही ठिकाणी लोक १००-२०० ग्रॅम दुध पावडर खरेदी करत असल्याचं आढळून आलंय. देशाची तिजोरी जवळपार रिकामी झाली आहे. त्यामुळे 2022 मध्ये श्रीलंकेला दिवाळखोर घोषित केलं तर आश्चर्य वाटयला नको.

हेही वाचा: हाँगकाँग विधिमंडळाचा ‘चिनी चेहरा’

श्रीलंकेचे सरकार राजपक्षे कुटुंबीयांच्या नेतृत्वाखाली काम करतंय. एक भाऊ गोटाभया राजपक्षे राष्ट्रपती आहे आणि दुसरा भाऊ महिंदा राजपक्षे पंतप्रधान आहे. सर्व महत्त्वाचे अधिकार राजपक्षे कुटुंबाकडे आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sri Lanka
loading image
go to top