esakal | भयानक ! जेवणासाठी चेंगराचेंगरी; १५ महिलांसह ५ मुले ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Stamped For Food 15 Women's And 5 Children Death At Niger

भयानक ! जेवणासाठी चेंगराचेंगरी; १५ महिलांसह ५ मुले ठार

sakal_logo
By
वृत्तसेवा

डिफ्फा : जेवणासाठी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एकूण २० जण ठार झाल्याची घटना आफ्रिकेतील नायजर देशातील डिफ्फा या शहरात घडली आहे. मृतांमध्ये १५ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे. निर्वासितांसाठी जेवणाचे वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत या २० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या माहितीनुसार, निर्वासित आणि विस्थापितांसाठी खाद्यपदार्थ, कपडे, तेल आणि पैसे देण्यात येणार होते. याची माहिती समजताच हजारो लोकांनी वाटप केंद्राजवळ गर्दी केली. रांगेत उभ्या असलेल्या पहिल्या काहीजणांना वस्तू मिळाल्यानंतर अनेकांना आनंद झाला. मात्र, लवकर या वस्तू मिळाव्यात यासाठी रेटारेटी सुरू झाली. त्या गोंधळात काही महिला आणि लहान मुलं जमिनीवर पडले आणि या गोंधळातच चेंगराचेंगरी झाली.

अनेकांना मागे टाकत 'ही' व्यक्ती बनली भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती

डिफ्फा येथील युवा आणि सांस्कृतिक केंद्रात निर्वासितांसाठी मोफत जेवण वाटप करण्यात येणार होते. यावेळी त्यांना काही पैसेही देण्यात येत होते. या ठिकाणी जवळपास अडीच लाखाहून अधिक निर्वासित आणि विस्थापित झालेले नागरिक वास्तव्य करत आहेत. दरम्यान, डिफ्फाच्या राज्यपाल इसा लेमीन यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली.