थायलंडच्या पंतप्रधानांचं विचित्र वर्तन, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच फवारलं सॅनिटायझर; पाहा व्हिडीओ

थायलंडच्या पंतप्रधानांचं विचित्र वर्तन, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच फवारलं सॅनिटायझर; पाहा व्हिडीओ

थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांच्या विचित्र वर्तनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच पंतप्रधान प्रयुत यांनी सॅनिटायझर फवारल्याचा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांना आपल्या दिलखुलास स्वभावामुळे ओळखलं जातं. पत्रकारांसोबत अनेकदा मस्करी करताना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. मात्र, ओचा यांनी आता पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्यावर सॅनिटायझर फवारुन चर्चेला तोंड फोडलं आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्री तुरुंगात गेल्यामुळे ओचा सरकार चर्चेत आहे. नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे थायलंडवासियांचं लक्ष लागलं आहे.  

मंगळवारी पंतप्रधान ओचा एका पत्रकार परिषदेत आले होते. तेव्हा मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे ओचा नाराज झाल्याचे दिसले. पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांची सरबत्ती पाहून पंतप्रधान भर पत्रकार परिषदेतून उठले अन् सॅनिटायझरची बाटली घेऊन आले. त्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांवर सॅनिटायझर फवारले. पंतप्रधानाचं हे विचित्र वर्तन कॅमेऱ्यांमध्ये कैद झालं.

पाहा व्हिडीओ -

मंत्रिमंडळातील रिक्त जागांबाबत पत्रकांरांनी विचारलेल्या काही रोखठोक प्रश्नामुळे पंतप्रधान ओचा यांचा राग अनावर झाला होता.  पत्रकारांनी त्यांना संभावित उमेदारांच्या नावावरुन प्रश्नाची सरबत्ती केली होती. यावर ओचा म्हणाले की, तुमच्याकडे विचारण्यासाठी दुसरे प्रश्न आहेत का? मला माहीत नाही, मी याला कधी पाहिलेच नाही. '  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com