भारताशी संबंध बळकट करणार; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन

पीटीआय
Sunday, 31 January 2021

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी शुक्रवारी (ता.२९) दूरध्वनीवरून चर्चा केली. भारत व अमेरिकेतील बळकट संबंध आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये दृढ सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेली ही पहिलीच चर्चा होती.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी शुक्रवारी (ता.२९) दूरध्वनीवरून चर्चा केली. भारत व अमेरिकेतील बळकट संबंध आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये दृढ सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेली ही पहिलीच चर्चा होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्या संधींचा वापर चांगल्या प्रकारे करण्यासाठी आणि समान आव्हानांचा मुकाबला करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. ब्लिंकन यांनी नुकताच परराष्ट्र मंत्रालयाची सूत्रे स्वीकारली असून भारतीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा प्रथमच संवाद साधला. या दोन मंत्र्यांच्या चर्चेत कोरोनावरील लसीकरणासाठीचे प्रयत्न, प्रादेशिक विकास, द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारासाठी उचलण्यात येणारी पावले आदी मुद्देही होते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले.  हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत हा अमेरिका जवळचा भागीदार असल्याचे सांगत ब्लिंकन यांनी भारताच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘क्वाड’सह प्रादेशिक सहकार्याचा विस्तार करण्याबरोबरच एकत्र काम करण्याचे महत्त्व विशद केले. जागतिक मुद्यांवर समन्वयाने एकत्र काम करण्यावर दोघांनी एकमत दर्शविले आणि प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. 

महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब

‘सुरक्षित व स्वस्त लस पुरविणार’
कोरोनानंतरच्या जगातील आव्हानांचा स्वीकार करून सुरक्षित आणि माफक दरात लस उपलब्ध करण्याच्या जबाबदारीवर जागतिक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी एकत्र काम करण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. शांतता आणि सुरक्षिततेसाठी हिंद-प्रशांत क्षेत्रात काम करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: strengthen ties with India Tony Blinken