Syria Drone Attack : सीरियातील सैन्य अकादमीवर भीषण ड्रोन हल्ला! 100हून अधिक जणांचा मृत्यू

syria attack on military academy at least 100 killed drone attack Syrian military academy marathi news
syria attack on military academy at least 100 killed drone attack Syrian military academy marathi news

सीरियाच्या सैन्य अकादमीवर ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात कमीत कमी १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला सीरियाच्या होम्स शहरत असलेल्या सैन्य कॉलेजवर करण्यात आला आहे.पदवीदान समारंभ सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आला. गुरुवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या ड्रोन हल्ल्यात अनेक लोक जखमी देखील झाले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सीरियाचे संरक्षणमंत्री या पदवीदान समारंभातून निघून गेल्यानंतर काही मिनीटातच या ठिकाणावर ड्रोनच्या मदतीने बॉम्ब टाकण्यात आले. अद्याप या हल्ल्यात कुठल्याही संघटनेचे नाव पुढे आलेले नाही तसेच कुठल्याही गटाने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाहीये.

syria attack on military academy at least 100 killed drone attack Syrian military academy marathi news
Nanded Deaths : तुमच्या चुकांची शिक्षा गरिबांना का देता? आक्रोश करणाऱ्या 'त्या' महिलेचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

सीरीयाच्या लष्कराने या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्याकडून समर्थन देण्यात येत असलेल्या बंडखोरांना जबाबदार धरले आहे. मात्र अद्याप या हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यूद्धामुळे उध्वस्त झालेल्या सीरीयामध्ये आजपर्यंत झालेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला मानले जात आहे. सीरीयामध्ये मागील १२ वर्षांपासून गृहयुद्ध पेटले आहे.

syria attack on military academy at least 100 killed drone attack Syrian military academy marathi news
India-Russia: भारत शक्तीशाली देश, मोदींच्या नेतृत्वात अधिक मजबूत होतोय; पुतिन यांनी केलं कौतुक

आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाहीये, सीरीयाच्या लष्कराने एक निवेदन जारी करत स्पोटके बसवण्यात आलेल्या ड्रोनने या कार्यक्रमाच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमींमध्ये काही महिला आणि मुले देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com