
नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जगभरातील बहुतांश देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. अनेक गाईडलाईन्स जारी करुन कडक नियमावली जाहीर करण्यात आली. मास्क, फिजीकल डिस्टन्सिंग आणि हात धुणे-सॅनिटायझरचा वापर हा अनिवार्य झाला. हे नियम मोडणाऱ्यांना कायद्याअंतर्गत दंडही झाला. मात्र, कोरोना काळातील दंडाविषयीची एक आगळीवेगळीच घटना समोर आली आहे. तैवानमध्ये काओसिंग शहरात कोरोनाच्या नियमांचे 8 सेंकदांसाठी पालन केले नाही म्हणून तब्बल 2, 58, 329 रुपयांचा दंड झाला आहे.
हेही वाचा - सौदी अरेबियात ब्रिटिश सैनिक का आहेत तैनात? कोणत्या संकटाला घाबरलेत प्रिंस सलमान
ही घटना तैवानमधली आहे. कोरोना व्हायरसच्या क्वारंटाईन नियमांना फक्त 8 सेकंदासाठी तोडल्यामुळे हा भरमसाठ दंड ठोठावला गेला आहे. 3,500 डॉलर इतका हा दंड झाला आहे. ज्या व्यक्तीला हा दंड झालाय तो व्यक्ती फिलीपाईन्समधील स्थलांतरीत कामगार आहे. त्याला दक्षिण तैवानममधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तेंव्हा अगदी काही क्षणांसाठी हा व्यक्ती आपल्या हॉटेल रुमच्या बाहेर आला, आणि त्यामुळे या व्यक्तीला हा दंड ठोठावण्यात आल्याचं आरोग्य विभागाने सांगितलंय.
सीएनएनने दिलेल्या बातमीनुसार, हा व्यक्ती काही क्षणांसाठी आपल्या क्वारंटाईन रुममधून बाहेर आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ती पाहून हॉटेलच्या एका स्टाफने आरोग्य विभागाशी संपर्क साधला. आणि या तक्रारीनुसार, आरोग्य विभागाने या कामगाराला एक लाख तैवानी डॉलरचा दंड केला आहे. जो 3,500 इतका अमेरिकन डॉलरइतका होतो. तैवानच्या कडक क्वारंटाईन नियमावली नुसार, क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीला त्याच्या खोलीतून बाहेर पडण्याची जराही मुभा नाहीये, मग ते काही क्षणांसाठी असो वा मिनिटांसाठी असो. आणि म्हणूनच निव्वळ आठ सेंकदासाठी बाहेर आलेल्या या कामगाराला एवढा मोठा भुरदंड सोसावा लागला आहे. आरोग्य विभागाने या उदाहरणावरुन संदेश दिलाय की, लोकांनी असं समजू नये की क्वारंटाईन रुममधून बाहेर आल्याने काही दंड होत नाही.
हेही वाचा - सर्वात प्रथम लस घेणाऱ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या शुक्लांचा समावेश
काओसिंग शहरात एकूण 56 क्वारंटाईन सेंटर आहेत. तसेच एकूण तीन हजार क्वारंटाईन रुम्स आहेत.कोरोना व्हायरसबाबतची परिस्थिती अत्यंत जबाबदारीने हाताळल्याबाबत तैवानचे जगभरातूनच कौतुक करण्यात आलं आहे. तैवानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू न करताही त्यांनी फक्त कडक नियमांच्या अंमलबजावणीतून कोरोनाला आळा घातला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.