तैवानच्या वायुदलानं चीनचं विमान पाडलं? व्हिडिओ व्होतोय व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 September 2020

हद्दीत घुसलेल्या चिनी विमानाला तैवानच्या हवाईदलाकडून सूचना देण्यात आली. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने तैवानने विमान पाडले. या घटनेत वैमानिक जखमी झाल्याचेही समजते.

ताइपे : चीनसोबतच्या तणावपूर्ण वातावरणात इवलुशा वाटणाऱ्या (छोट्याशा) तैवानने चीनचे सुखोई विमान पाडल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. चीन किंवा तैवान यांच्याकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टसनंतर तैवानने आपल्या हद्दीत आलेल्या चीनच्या  सुखोई-35 विमान पाडल्याची बातमी दिल्यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. यासाठी तैवानने अमेरिकन पेट्रियाट मिसाइल सिस्‍टमचा वापर केल्याचेही बोलले जात आहे. 

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवान सज्ज : लष्कर प्रमुख

वृत्तानुसार, हद्दीत घुसलेल्या चिनी विमानाला तैवानच्या हवाईदलाकडून सूचना देण्यात आली. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने तैवानने विमान पाडले. या घटनेत वैमानिक जखमी झाल्याचेही समजते. जर हे वृत्त खरं असेल तर दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. मागील काही महिन्यांपासून  चिनी लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत गिरट्या घालत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यापूर्वी तैवानने आपल्या हद्दीत घुसल्यानंतर चिनी विमान हुसकावून लावल्याचा प्रकारही समोर आले होते. 

प्रियांका गांधींच्या मदतीने डॉ खान राजस्थानात; योगी सरकारवर गंभीर आरोप

चीनच्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाचे प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानचे नौदल आणि हवाई दलाला सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी सैन्याची ताकद वाढवण्यासंदर्भात अनेक घोषणाही यापूर्वी केल्या आहेत. तैवान राखीव सैन्य दल विकसित करण्यावरही भर देत आहे. दोन्ही देशातील तणावात तैवानने अमेरिकेकडून खरेदी केलेल्या  पॅट्रियॉट एडवांन्स कॅपिबिलिटी-3 मिसाइल खरेदीची भर पडली आहे. अमेरिकेसोबत तैवानने जवळपास 620 मिलियन डॉलरचा करार केला आहे. याचाही चीनला राग आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: taiwan shots down china sukhoi 35 fighter jet in south china sea video viral