तैवानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; 21 लढाऊ विमानं अन् युद्धनौका घेऊन 'ड्रॅगन'चा प्रवेश

चीन (China) आणि तैवानमधील (Taiwan) युद्ध दिवसेंदिवस वाढत होत आहे.
People's Liberation Army Air Force
People's Liberation Army Air Forceesakal
Summary

चीन (China) आणि तैवानमधील (Taiwan) युद्ध दिवसेंदिवस वाढत होत आहे.

चीन (China) आणि तैवानमधील (Taiwan) युद्ध दिवसेंदिवस वाढत होत आहे. या मागचं कारणही अगदी स्पष्ट आहे. खरं तर चीन तैवानच्या हद्दीत वारंवार घुसखोरी करत आहे. याचे पुरावेही तैवानकडून सातत्यानं सादर केले जात आहेत. रशिया-युक्रेन युद्धानं (Russia-Ukraine War) जगात आधीच समस्या निर्माण केल्या आहेत. आता वरून दुसरं युद्ध सुरू झालंय.

तैवाननं म्हटलंय की, त्यांनी चीनच्या जवळपास 21 युद्ध विमानं आणि पाच नौदल जहाजांचा मागोवा घेतलाय. यातील आठ जहाजांनी तैवानच्या समुद्राची मध्यरेषा ओलांडलीय. तैवान न्यूजच्या वृत्तानुसार, तैवान राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देशभरातील 17 लढाऊ विमानं आणि चिनी सैन्याच्या (Chinese Army) पाच जहाजांचा माग काढला. तैवानच्या लष्करानं (Taiwan Army) सांगितलं की, पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या (People's Liberation Army Air Force) 17 पैकी आठ युद्धविमानांनी तैवान समुद्राची मध्यरेषा ओलांडलीय.

People's Liberation Army Air Force
दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणाऱ्या हवाला एजंटला अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

या विमानांमध्ये चार शिआन जेएच-7 फायटर बॉम्बर, दोन सुखोई एसयू-30 फायटर आणि दोन शेनयांग जे-11 जेट विमानांचा समावेश आहे. जेएच-7 आणि सुखोई-30 विमानांनी तैवानच्या उत्तरेकडील टोकाची मध्यरेषाही ओलांडली, तर दोन जे-11 लढाऊ विमानांनी दक्षिणेकडील टोकाला स्पर्श केलाय. मंत्रालयानं म्हटलंय की, चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तत्काळ उत्तर देण्यासाठी त्यांनी लढाऊ हवाई गस्त, नौदल जहाजं आणि हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केलीय. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीननं तैवान समुद्रामध्ये आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. तैवानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करून ड्रॅगन सातत्यानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

People's Liberation Army Air Force
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी; CM बोम्मईंकडून थेट चौकशीचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com