तैवानमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 36 जणांचा मृत्यू, 72 जखमी

Taiwan_Train
Taiwan_Train

तैपेई : तैवानच्या पूर्व भागात रेल्वे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला, यामध्ये ३६ लोकांचा मृत्यू झाला असून ७२ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. ही दुर्घटना बोगद्यात झाली असल्याने मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यताही आपत्कालीन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून अजूनही बचावकार्य सुरू आहे. 

ही रेल्वे तैटुंगच्या दिशेने जात होती. अपघात झाला त्यावेळी ३५० प्रवासी त्या रेल्वेमधून प्रवास करत होते. रेल्वे रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला. बोगद्यातच रेल्वेची भिंतीला धडक बसली असल्याने मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

सध्या टॉम्ब स्वीपिंग फेस्टिव्हल सुरू असल्याने तेथील लोक सुट्टीचा आनंद घेत आहेत. यामुळे अनेक तैवानी नागरिक रेल्वे आणि बसने प्रवास करत असतात. पण या दुर्घटनेमुळे सर्वांच्या आनंदावर पाणी फेरले गेलं आहे. 

ट्रेनवर ट्रक पडल्याने झाला अपघात
पूर्व तैवानमधील हा रेल्वे मार्ग पर्यटकांच्या आवडीचा रेल्वेमार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची संख्याही जास्त असते. रेल्वे तैटुंगच्या दिशेने जात असताना बोगद्याजवळ एक ट्रक रेल्वेवर पडला. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ट्रकचे अवशेष या ठिकाणी दिसून येत आहेत. अपघातानंतर प्रवासी जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडत होते. या दुर्घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहेत. 

तिसरा मोठा रेल्वे अपघात
दरम्यान, ऑक्टोबर २०१८मध्येही तैवानमध्ये अशाच प्रकारे रेल्वे अपघात झाला होता. त्यावेळीही उत्तर-पश्चिम सीमा भागात एक एक्सप्रेस रेल्वे रुळावरून घसरली होती. त्यामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० लोक जखमी झाले होते. त्याआधी १९९१ मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात ३० जणांचा मृत्यू तर ११२ जण जखमी झाले होते. तैवानमध्ये आज झालेला अपघात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचे म्हटले जात आहे. 

 - जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com