

Taliban Airstrike Pakistan ISIS-K Attack
esakal
Afghanistan Pakistan Conflict : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी तणावाने नवे वळण घेतले आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी संघटना 'आयएसआयएस-के' (ISIS-K)च्या तळांवर मोठा हवाई हल्ला केल्याचा दावा केला आहे. या तळांवरून अफगाणिस्तानातील नागरिकांवर हल्ल्यांचे कट रचले जात असल्याचे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानकडून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.