
दाढी नाही तर नोकरी नाही; तालिबान सरकारचा नवा फतवा
काबुल : तालिबान (Taliban) सरकाच्या मंत्रालयाने सोमवारी सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची दाढी आणि ड्रेसकोड तपासला. यावेळी प्रवेशद्वार उभं राहून, कर्मचाऱ्यांनी दाढी वाढवली आहे की नाही, तसंच ड्रेस कोडचं पालन केलं की नाही, याची चौकशी करण्यात आली. रॉयटर्स या वृत्त संस्थेने सुत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.
हेही वाचा: मेक्सिकोत मोठं शूटआऊट; गोळीबारात १९ जणांचा मृत्यू
मंत्रालयातील प्रतिनिधी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना दाढी न करण्याच्या, लांब सैल सदरा आणि पायघोळ असलेले अफगाणी पद्धतीचे कपडे आणि टोपी किंवा पगडी घालण्याच्या सूचना देत होते अशी माहिती तीन सुत्रांनी दिली.
हेही वाचा: रशिया अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकेल का? Research मध्ये धक्कादायक खुलासा!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाढी नसलेल्या आणि ड्रेस कोडचं पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, तालिबानचं सरकार सत्तेत आल्यापासून, अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळे फतवे काढण्यात आले आहेत. महिलांवरील निर्बंधांनंतर आता पुरुषांना देखील दाढी आणि इतर इस्लामशी संदर्भातील गोष्टींचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरी अजून याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा: 'मला लेखी धमक्या, सरकार पाडण्यामागे...', पाक PM इम्रान खान यांचा दावा
Web Title: Taliban Government No Beard No Job New Fatwa Issued For Dress Coude
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..