esakal | अखेर तालिबानने पंजशीर जिंकलं ?
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

अखेर तालिबानने पंजशीर जिंकलं ?

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: तालिबानने (Taliban) पंजशीर खोऱ्यामध्ये (panjshir valley) विजय (war won) मिळवल्याचं वृत्त आहे. दोन आठड्यांपूर्वी तालिबानने पंजशीर खोरं वगळता अफगाणिस्तानातील (afganistan) सर्व प्रांतावर नियंत्रण मिळवलं होतं. पंजशीरमध्ये तालिबानला जोरदार प्रतिकार होईल, असा अंदाज होता. त्यानुसार, पंजशीर खोऱ्यात लढाई सुरु होती. पंजशीर खोऱ्यासह संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्याचं तालिबानमधील तीन सूत्रांनी सांगितलं आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पंजशीर जिंकल्याचा जल्लोष म्हणून हवेत गोळीबार करण्यात आला. "आम्ही संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं आहे. त्रास देणाऱ्यांचा पराभव झाला आहे. पंजशीर आता आमच्या नियंत्रणाखाली आहे" असं तालिबानच्या कमांडरने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: अनिल देशमुख प्रकरण: CBI अधिकाऱ्याला 'आयफोन'ची लाच

नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या पंजशीरमध्ये तालिबानला कधीही विजय मिळवता आलेला नव्हता पंजशीरचे दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली तालिबान विरोधात लढाई सुरु होती. अफगाणिस्तानातील तालिबान विरोधी योद्धे इथे एकवटले होते. रशियन फौजा सुद्धा पंजशीर खोऱ्यात निष्प्रभ ठरल्या होत्या.

हेही वाचा: 'ती' स्वत:चे केस खायची, डॉक्टरांनी पोटातून काढला केसांचा गोळा

अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह देश सोडून गेल्याचे वृत्त आले होते. पण या वृत्तात अजिबात तथ्य नसल्याचं अमरुल्लाह सालेह यांनी टोलो न्यूजला सांगितलं. आपल्या मार्गात भूसुरुंग (mine) तर पेरलेले नाहीत ना? याची खातरजमा करुन घेण्यासाठी तालिबान पंजशीरमधल्या (Taliban panjshir) वयोवृद्ध सैनिकांचा 'माइन क्लियरन्स टुल' (mine clearance tool) म्हणून वापर करतेय असा आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh) यांनी केला आहे.

अमरुल्लाह सालेह सध्या पंजशीरमध्ये असून ते रेसिस्टन्स फोर्सचे नेतृत्व करत आहेत. तालिबानने पंजशीरला मिळणाऱ्या मानवीय मदतीचे मार्ग रोखून धरले आहेत. तालिबानने पंजशीरमधल्या फोन लाइन्स आणि वीज पुरवठा खंडीत केल्याचा आरोप अमरुल्लाह सालेह यांनी केला.

loading image
go to top