आमच्या अधिकाऱ्याला तात्काळ सोडा; बायडेन यांचा तालिबानला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

joe biden

अमेरिकन किंवा कोणत्याही निर्दोष नागरिकाला धमकी देणं सहन केलं जाणार नाही अशा शब्दात बायडेन यांनी इशारा दिला आहे.

आमच्या अधिकाऱ्याला तात्काळ सोडा; बायडेन यांचा तालिबानला इशारा

न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी तालिबानला आता थेट इशारा दिला आहे. अमेरिकेने त्यांचे सैन्य अफगाणिस्तानमधून (Afghanistan) मागे घेतल्यानंतर तिथे तालिबानने (Taliban) ताबा मिळवला. सध्या अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट अशी आहे. तालिबान अमेरिकेकडे अफगाणिस्तान सरकारच्या जप्त केलेल्या पैशांची मागणी करत आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एका अमेरिकन नौदल अधिकाऱ्याची सुटका तालिबानने करावी असं म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकन नौदलातील माजी अधिकारी मार्क फ्रेरिच यांना तालिबानने कैदेत ठेवलं असल्याचं ज्यो बायडेन यांनी म्हटलं.

बायडेन म्हणाले की, दोन वर्षांपासून अमेरिकन नौदलातील मार्क फ्रेरिच यांना अफगाणिस्तानात ओलिस ठेवण्यात आलं आहे. एक सिव्हिल इंजिनिअर असलेल्या फ्रेरिच यांनी अफगाणिस्तानमध्ये दहा वर्षे अनेक नागरिकांची मदत केली. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. तरीही तालिबानने दोन वर्षांपासून त्यांना ओलिस ठेवलं आहे. अमेरिकन किंवा कोणत्याही निर्दोष नागरिकाला धमकी देणं सहन केलं जाणार नाही. याप्रकरणी कसलीही तडजोड करणार नाही अशा शब्दात बायडेन यांनी तालिबानला इशारा दिला आहे.

हेही वाचा: सीरियात अमेरिकन महिला चालवायची ISIS दहशतवादी संघटना, आता FBI च्या ताब्यात

तालिबानने मार्क यांना तात्काळ सोडून द्यावं, यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असंही बायडेन म्हणाले. तालिबान अमेरिकन कैद्यांच्या बदल्यात बायडेन यांच्याकडे त्यांच्या काही मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

अफगाणिस्तान सरकारचा पैसा तालिबानला मिळू नये याची तरतूद अमेरिकेने केली आहे. जगभरातील इतर अनेक देशांनी थेट तालिबानच्या हातात पैसे देण्यास नकार दिला आहे. तर दुसऱ्या बाजुला भारत, अमेरिकेसह काही देशांनी अफगाणिस्तानच्या लोकांना मदतीसाठी काही साहित्य पाठवलं आहे.

Web Title: Taliban Wont Be Recognized Until Us Hostage Mark Frerichs Is Released Says Joe Biden

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Joe Bidenamericataliban
go to top