पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला; मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न

वृत्तसेवा
Monday, 27 January 2020

  • सरकारकडून कारवाई नाही; मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले सुरूच आहेत. नानकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक केल्याची घटना ताजीच असताना सिंध प्रांतातील एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला असून जमावाने तेथील मंदिर आणि मूर्तींची हानी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही दिवसांपूर्वीच पूर्व सिंध प्रांतातील नानकाना साहिब गुरुद्वारावर काही कट्टरपंथीय गटाने दगडफेक केली होती. तसेच हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने धर्म परिवर्तन केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सरकारने आश्‍वासन देऊनही हिंदू आणि मंदिरावरचे हल्ले थांबत नसल्याचे चिन्हे आहेत. सिंध प्रांतात माता राणी भातियानी मंदिराची तोडफोड करण्यात आली. यासंदर्भात पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवर मंदिराचे चार फोटो शेअर केले आहेत. त्यात मूर्तीवर काळा रंग टाकल्याचे आणि हानी केल्याचे दिसते. तसेच मंदिराची मोठी हानी करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. पवित्र मूर्ती आणि ग्रंथाचीही हानी झाल्याचे पत्रकार नायला यांनी म्हटले आहे. माता राणी भातियानींची पूजा ही साधारणपणे पश्‍चिम राजस्थान आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतात केली जाते. या देवीचे सर्वात मोठे मंदिर राजस्थानच्या बाडमेर आणि जासोल जिल्ह्यात आहे.

विमान दुर्घटना : ८३ प्रवाशांसह विमान कोसळलं 

हिंदू युवतीचे मंडपातूनच अपहरण
दरम्यान, पाकिस्तानमध्ये जरबदस्तीने धर्मांतर केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. एका हिंदू नवविवाहितेचे मंडपातूनच अपहरण करून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आणि त्यानंतर मुस्लिम युवकाने तिच्याशी विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती बाई असे युवतीचे नाव असून तिचा हाला (जि. मातीहरी, सिंध प्रांत) शहरात शनिवारी विवाह होता. मात्र एका टोळक्‍याने तिचे अपहरण केले आणि शाहरुख गुल नावाच्या तरुणाशी तिचा विवाह लावून देण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. उलट पोलिसांनी आरोपीलाच मदत केल्याचे म्हटले आहे.

दरवर्षी हजार तरुणींचे धर्मांतर
अमेरिकेच्या सिंधी फाउंडेशनच्या अहवालानुसार दरवर्षी पाकिस्तानातील एक हजार सिंधी हिंदू 12 ते 28 वयोगटांतील तरुणींचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते आणि त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात. गेल्या काही महिन्यांपासून अशा घटनांत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात 19 वर्षीय जगजित कौर ही अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. कालांतराने ती मुस्लिम झाल्याचे आणि जबरदस्तीने तिचा विवाह केल्याचे उघड झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temple Vandalised & Scriptures Desecrated In Pakistans Sindh