शक्तिशाली पासपोर्ट्सच्या यादीत भारताचा ८७ वा क्रमांक; जपान आघाडीवर

युरोपीय राष्ट्रांचं वर्चस्व या वर्षी मोडीत काढण्यात आलं आहे.
Passport
PassportSakal

जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचा पासपोर्ट हा सगळ्यात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत आघाडीवर आहे. जग आता कोरोना महामारीच्या परिस्थितीमधून हळूहळू वर येत आहे. त्यामुळेच युरोपीय राष्ट्रांचे वर्चस्व असलेल्या महामारीपूर्वीच्या या क्रमवारीत आता बदल झाल्याचं दिसून आलं आहे. (Most Powerful passport in 2022)

Passport
Sri Lanka : रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

जपान (Japan), सिंगापूर (Singapore) आणि दक्षिण कोरियाच्या (South Korea) पासपोर्टला जवळपास १९३ देशांमध्ये कोणत्याही कटकटींशिवाय प्रवेश आहे. हेनली अँड पार्टनर्स या पासपोर्ट क्रमवारी ठरवणाऱ्या कंपनीने ही माहिती दिली आहे. साल २०२२ साठी ही यादी जारी करण्यात आली आहे.

Passport
...म्हणून आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला जातो, घ्या जाणून

या क्रमवारीत रशियाचा ५० वा क्रमांक लागतो. रशियन पासपोर्टला ११९ देशांमध्ये कोणत्याही अडचणींशिवाय प्रवेश मिळतो. चीनचा क्रमांक ६९ वा असून ८० देशांत प्रवेश आहे, तर भारताचा ८७ वा क्रमांक लागतो. अफगाणिस्तानचा क्रमांक सर्वात खालचा आहे. त्या पासपोर्टवर केवळ २७ देशांमध्ये प्रवेश मिळू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com