चीनने केलेल्या दाव्यांना आधार नाही

पीटीआय
Tuesday, 4 August 2020

दक्षिण चिनी समुद्राबाबतच्या चीनचा कोणताच दावा मंजूर करणार नाही, ही अमेरिकेची जुनी भूमिका आता ऑस्ट्रेलियानेही स्वीकारली आहे. यावरूनच ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात सध्या ‘ट्वीटर वॉर’ रंगले आहे. दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर चीन सरकारने सांगितलेल्या दाव्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ऑस्ट्रेलियाने नुकतेच संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगितले आहे. यामुळे चीनने ऑस्ट्रेलियावर जोरदार टीका केली आहे.

दक्षिण चिनी समुद्रात ऑस्ट्रेलियानेही ओढली अमेरिकेची री
बीजिंग - दक्षिण चिनी समुद्राबाबतच्या चीनचा कोणताच दावा मंजूर करणार नाही, ही अमेरिकेची जुनी भूमिका आता ऑस्ट्रेलियानेही स्वीकारली आहे. यावरूनच ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात सध्या ‘ट्वीटर वॉर’ रंगले आहे. दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर चीन सरकारने सांगितलेल्या दाव्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ऑस्ट्रेलियाने नुकतेच संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगितले आहे. यामुळे चीनने ऑस्ट्रेलियावर जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनबरोबरील संबंध आम्हाला बिघडवायचे नाहीत, असे काही दिवसांपूर्वीच सांगणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चीनच्या दाव्यांवर शंका व्यक्त करत वादाची ठिणगी टाकली आहे. ‘चीनच्या हालचाली या अस्थिरता निर्माण करणाऱ्या असून यामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो, असे आपण भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले आहे,’ असे ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ’फॅरल यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट केले होते. 

इस्त्राईलने स्वत:भोवती तयार केलंय अदृष्य कवच; शत्रू राष्ट्राला हल्ला करणं सोपं नाही

बेटांवरील चीनचा ताबा
दक्षिण चिनी समुद्रातील अनेक छोट्या बेटांचा चीनने ताबा घेतलेला आहे. या बेटांवर इतर सहा देशांनीही हक्क सांगितला असला तरी लष्करी बळावर चीनने अद्याप कोणालाही धूप घातलेली नाही. या बेटांवर चीनने विमाने उतरण्यासाठी धावपट्ट्या निर्माण केल्या असून लष्करी तळ उभारले आहेत. 

कोविड 19 संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली भीती

अमेरिका-ऑस्ट्रेलिया आघाडी मजबूत
दक्षिण चिनी सागरातील चीनचे दावे ऑस्ट्रेलियानेही फेटाळल्याने अमेरिकेला एक मोठा जोडीदार मिळाला आहे. या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्री पातळीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत चीनविरोधातील आघाडी अधिक मजबूत करण्याचा निश्‍चय करण्यात आला आहे. तसेच, दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनीही दक्षिण चिनी समुद्रातील मुक्त स्वातंत्र्याच्या हक्काची घोषणा करत चीनला दाव्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no basis for the claims made by China