esakal | इजिप्तमध्ये सापडली तब्बल 3000 वर्षांपूर्वीची 'Lost Golden City'
sakal

बोलून बातमी शोधा

Lost Golden City

इजिप्तमध्ये सापडली तब्बल 3000 वर्षांपूर्वीची 'Lost Golden City'

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : ऐतिहासिकदृष्ट्या 'The Rise of Aten' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची स्थापना तुनखामूनचे किंग तुत यांनी आमेनहोतेप तिसरा (1391-1353 बी.सी.) यांनी केली होती. आमेनहोतेपचा मुलगा अखेनतेन, तसेच तुत आणि त्यांच्या सहकार्यांनी 'गोल्डन सिटी'ची स्थापना करुन ती सिटी सुरु ठेवली होती.

शहराचा समृद्ध इतिहास असूनही ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, राजा आमेनहोतेप याचे तीन राजवाड्यांचे निवासस्थान होते आणि लक्सरमधील सर्वात मोठी प्रशासकीय व औद्योगिक वसाहत देखील होती, ती अद्याप पुरातत्त्व विभागाला सापडली नाही. गोल्डन सिटीच्या उत्खननाचे नेतृत्व करणारे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पुरातन वास्तू माजी राज्यमंत्री जाही हवस (Zahi Hawass) यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की, बर्‍याच परराष्ट्र मोहिमांनी या शहराचा शोध घेतला. परंतु, हा खजिना कोणालाही सापडला नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.

जगातील 50 टक्के महिलांना स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही!

हवस यांच्या टीमला 2020 मध्ये किंग तुत यांचा मृतदेह सापडला. त्याच आशेने पुन्हा या प्राचीन खजिन्याचा शोध घेण्यास सुरू केली. या टीमने येथील प्रदेशात शोध मोहीम राबवली. कारण, होरेमहेब Horemheb आणि ए.वायची Ay मंदिरे या भागात आढळली होती, असे हवस यांनी सांगितले. त्यांना उत्खनन करताना प्रारंभी विटा आढळल्या, तेव्हा त्यांना त्या गोष्टीचे आश्चर्य वाटले. हवस यांच्या टीमला कल्पना येताच, त्यांनी शोध मोहीम अधिक तीव्र करत येथील एक भले मोठे शहर शोधून काढले. हवास म्हणाले, “ या शहरात रस्ते, घरे बांधली गेली आहेत. तर 10 फूट (3 मीटर) उंच भिंती उभारण्यात आल्या आहेत.”

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या John Hopkins University इजिप्शोलॉजीचे प्राध्यापक, बेट्ससी ब्रायन Betsy Brian यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तुटानखामूनच्या थडग्यानंतर या हरवलेल्या शहराचा शोध हा सर्वात महत्त्वाचा पुरातत्व शोध आहे. हरवलेल्या शहराचा शोध हा इजिप्शियन लोकांच्या जीवनाची केवळ विलक्षण झलक मानली जाईल. त्या काळात हे साम्राज्य सर्वात श्रीमंत होते, परंतु इतिहासाच्या सर्वात गूढ माहितीवर प्रकाश टाकण्यास हा शोध मदत करेल. अखेनतेन आणि राणी नेफरतीतीने Akhenaten and [Queen] Nefertiti अमर्णा येथे जाण्याचा निर्णय का घेतला? " याचाही खुलासा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

खरं सांगतोय! सुपरमार्केटमधून 'अ‍ॅपल'ची ऑर्डर दिली अन् मिळाला आयफोन

(इ.स.1350 च्या उत्तरार्धात अखेनतेन यांनी राज्य सुरू केल्याच्या काही वर्षानंतर, गोल्डन सिटीचा त्याग केला आणि इजिप्तची राजधानी अमर्णा येथे ते गेले). टीमने शोध मोहिमेत, आमेनहोतेपच्या प्राचीन वस्तू शोधल्या. पथकाला या वस्तु संपूर्ण ठिकाणी सापडल्या. त्यात वाइन वेल्स, रिंग्ज, स्कार्ब, रंगीत भांडी आणि चिखल विटा यांचा समावेश होता. ज्याने पुष्टी केली, की शहर 18 व्या घराण्याचा नववा राजा असलेल्या आमेनहोतेप तिसर्‍याच्या कारकिर्दीत सक्रिय होते. सात महिन्यांच्या उत्खननानंतर, पुरातत्वशास्त्रज्ञांनी बरीच अतिपरिचित जागा शोधून काढली. शहराच्या दक्षिणेकडील भागात, पथकाने ओव्हन आणि सिरेमिक स्टोरेज कंटेनरमध्ये भरुन ठेवलेले अन्नपदार्थ आणि स्वयंपाक क्षेत्र असलेल्या बेकरीचे अवशेषही शोधले. उत्खननाच्या दुसर्‍या भागात, पुरातत्वशास्त्रज्ञांना एक प्रशासकीय आणि निवासी जिल्हा आढळला आहे.

ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, इजिप्तच्या तज्ञांना अजूनही या गोष्टीचे आश्चर्य वाटते, की राजधानी का हलवली गेली आणि जर त्या वेळी गोल्डन सिटी खरोखरच सोडली गेली असेल, तर राजा तुत परत का आला? आणि शहर पुन्हा एकदा धार्मिक केंद्र म्हणून पुन्हा उघडले, तेव्हा हे शहर पुन्हा तयार करण्यात आले की नाही हे देखील एक रहस्य असल्याचे पुरातत्वने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top