चीनमध्ये आईस्क्रीमलाही झाला कोरोना; बॉक्स बाजारात पोहोचल्याने खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 17 January 2021

कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडलेल्या चीनमधून आणखीने एक खळबळ उडवणारी बातमी कळत आहे

बिजिंग- कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडलेल्या चीनमधून आणखीने एक खळबळ उडवणारी बातमी कळत आहे. चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचा विषाणू सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आईस्क्रीम खाणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. नवभारत टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

विषाणू असलेले आईस्क्रीम खाल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनच्या पूर्वेकडील तियानजिन भागात आईस्क्रीम विकले जात होते. येथील स्थानिक कंपनी या आईस्क्रीमची निर्मिती करत होती. तपासणीसाठी आईस्क्रीमचे काही नमुने घेण्यात आले होते. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईस्क्रीममध्ये कोरोनाचे विषाणू आढळले आहेत. 

शेतकरी समर्थकांना NIA कडून समन्स; बादल म्हणाले, हेतूपुर्वक त्रास देतंय सरकार

Tianjin Daqiaodao फूड कंपनीच्या 4,836 बॉक्समध्ये कोरोनाचे विषाणू आढळले आहेत. यातील 2,089 बॉक्सेस स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले होते, तर बाकी इतर राज्यात पाठविण्यात आले होते. शिवाय 935 बॉक्सचा पुरवढा स्थानिक बाजारात करण्यात आला होता. त्यातील 65 आईस्क्रीम विकण्यात आल्याची माहिती चायना डेलीने दिली आहे. आईस्क्रीम खाणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. 

आईस्क्रीममध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याचे कळतात Tianjin Daqiaodao फूड कंपनी आपल्या 1662 कर्मचाऱ्यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या लोकांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. शिवाय आईस्क्रिमचा पुरवढा ज्याच्यांकडे झाला किंवा जे आईस्क्रिम बॉक्सच्या संपर्कात आले असे दुकानदार, कर्मचारी यांची माहिती घेतली जात आहे. संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ट्रॅक केले जात आहे. 

मांजरेकरांची भररस्त्यात दादागिरी? गाडीला धक्का लागल्याने मारहाण केल्याचा आरोप

आईस्क्रीमध्ये विषाणू सापडल्याने ते एकाद्या माणसाकडून त्यात गेले असावेत, असा अंदाज आहे. कोरोना विषाणू थंडीच्या वातावरणात जास्त काळ टिकतो. आईस्क्रिममध्येही तो जास्त दिवस जिवंत राहू शकतो. कंपनीने हायजिनची योग्य काळजी न घेतल्याने विषाणू आईस्क्रीममध्ये गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही फूड कंपन्यांनी अन्न पदार्थ बनवताना किंवा विकताना आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tianjin Daqiaodao corona virus to ice cream in china