Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

US-India Relations Under Trump’s Envoy : ट्रम्प यांनी २२ ऑगस्ट रोजी भारतातील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर केली होती
Trump’s Special Envoy Sergio Gor addressing the media, emphasizing India as a strategic partner in global diplomacy.

Trump’s Special Envoy Sergio Gor addressing the media, emphasizing India as a strategic partner in global diplomacy.

esakal

Updated on

Sergio Gor’s Statement on India’s Strategic Importance : भारत आणि अमेरिकेतील ट्रेड वॉरनंतर दोन्ही देशांमध्ये काहीसे तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेने अतिरिक्त टॅरिफ लादल्याने भारताने नाराजी व्यक्त केली होती. शिवाय, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा रशिया, चीन सारख्या बलाढ्य राष्ट्रांकडूनही निषेध नोंदवला गेला आणि भारताला समर्थन दिले गेले. यामुळे ट्रम्प काहीसे एकाकी पडल्याचे दिसू लागले होते. अशात त्यांनी आता भारताची ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. 

भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत सर्जियो गोर यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. त्यांच्या विधानामुळे आता अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांना एक नवीन आयाम मिळणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

कारण, सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीसमोर दिलेल्या निवेदनात सर्जियो गोर म्हणाले की, भारत हा एक धोरणात्मक भागीदार आहे, ज्याचे मार्गदर्शन संपूर्ण प्रदेश आणि त्यापलीकडेही प्रभावित करेल. याचबरोबर ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ते अमेरिका आणि भारत यांच्यातील ही भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी काम करतील.

Trump’s Special Envoy Sergio Gor addressing the media, emphasizing India as a strategic partner in global diplomacy.
Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

ट्रम्प यांनी २२ ऑगस्ट रोजी भारतातील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर केली होती. त्यांना दक्षिण आणि मध्य आशियाई बाबींसाठी विशेष दूत म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. सर्वांच्या नजरा त्यांच्या भूमिकेवर होत्या. या अर्थाने भारतात त्यांची नियुक्ती खूप महत्त्वाची ठरणार आहे.

Trump’s Special Envoy Sergio Gor addressing the media, emphasizing India as a strategic partner in global diplomacy.
Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

याशिवाय सर्जियो गोर यांनी असेही म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. भारत केवळ एक प्रादेशिक मित्र नाही तर एक धोरणात्मक भागीदार आहे.

तसेच, भारतात गेल्यानंतर त्यांच्या प्राधान्यक्रम काय आहेत असे विचारले असता गोर म्हणाले - विश्वास पुनर्संचयित करणे, व्यापाराशी संबंधित समस्या सोडवणे आणि हवामान, संरक्षण व तंत्रज्ञानावर सहकार्य वाढवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com