Video : समुद्राखाली ज्वालामुखीचा स्फोट; अमेरिकेच्या किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा

अंतराळातून उपग्रहानं टिपली ज्वालामुखी स्फोटाची घटना; तीस वर्षातील सर्वात भीषण स्फोट
Volcanic Erruption
Volcanic Erruption

वॉशिंग्टन : पॅसिफिक महासागराच्या (Pacific Ocean) किनारपट्टीवर असलेल्या टोंगा (Tonga) या देशाजवळ शनिवारी समुद्रात ज्वालामुखीचा भीषण स्फोट (Volcanic Irruption) झाला. यामुळं अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला (west cost of America) त्सुनामीचा इशारा (Tsunami Alert) देण्यात आला आहे. या स्फोटाचा एक व्हिडिओ होनुलूलू नॅशनल वेदर सर्विसेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. (Tsunami advisory issued for the US West Coast due to large volcanic eruption near Tonga)

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, आज टोंगाजवळ एक प्रचंड मोठ्या ज्वालामुखीचा स्फोट झाल्याचं अंतराळातून उपग्रहाच्या माध्यमातून दिसून आलं आहे. ज्वालामुखी तज्ज्ञांच्या मते टोंगामध्ये गेल्या ३० वर्षातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट आहे. टोंगा हवामान खात्याच्या माहितीनुसार, संपूर्ण देशासाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लोकांना सुरक्षित स्थानी स्थलांतरीत होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, दुसरीकडे न्यूझिलंडच्या सैन्य दलानं म्हटलं की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. गरज पडल्यास मदत मागितल्यास आम्ही त्यासाठी तयार आहोत.

नक्की कुठे झालाय स्फोट?

ज्वालामुखीचा स्फोट टोंगा जवळच्या पॅसिफिक महासागरात हंगा टोंगा भागात झाला आहे. टोंगाची राजधानी नुकुअलोफा इथून हे स्फोटाचं स्थान उत्तर दिशेला सुमारे ६४ किमी अंतरावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com