हिलरी क्‍लिंटन म्हणजे 'युद्धखोरांची राणी' : तुलसी गबार्ड

Tulsi-Gabbard
Tulsi-Gabbard

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांचा 'युद्धखोरांची राणी' अशा शब्दांत डेमोक्रॅटिकच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी उल्लेख केला आहे. आगामी 2020च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गबार्ड यांना रशिया तिसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आणत असल्याचा आरोप हिलरी क्‍लिंटन यांनी केला होता. त्यावर शनिवारी (ता.19) गबार्ड यांनी प्रत्युत्तर दिले. 

गेल्यावर्षी गबार्ड यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्या हिंदू असल्याने भारत- अमेरिकी नागरिकांच्या त्या आवडीच्या उमेदवार आहेत. क्‍लिंटन यांनी एका मुलाखतीत गबार्ड यांना रशिया मदत करत असल्याचा आरोप केला होता. या मदतीतून त्या तिसऱ्या पक्षाच्या उमेदवार म्हणून समोर येतील, असे क्‍लिंटन यांनी म्हटले आहे.

गबार्ड यांचा संदर्भ देत हिलरी क्‍लिंटन म्हणाल्या की, मी भविष्यवाणी करत नाही. मात्र, त्यांचे लक्ष (रशिया) अशा उमेदवारावर आहे, जो डेमोक्रॅटिक उमेदवाराच्या प्राथमिक शर्यतीत आहे आणि त्यांची रशिया मदत करत आहे. क्‍लिंटन यांनी थेटपणे गबार्ड यांचे नाव घेतले नव्हते. मात्र शनिवारी गबार्ड यांनी ट्‌विटरवरून क्‍लिंटन यांच्या आरोपाला उत्तर दिले.

गबार्ड म्हणाल्या, वा! हिलरी क्‍लिंटन, आपण युद्धखोरांच्या राणी आहात. भ्रष्टाचाराचे मूर्तिमंत रूप शेवटी पडद्याबाहेर आले. डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून प्राथमिक निवड ही माझी आणि आपल्यामध्ये आहे. पाठीत वार करण्यापेक्षा थेट समोर येऊन सामना करा, असे आव्हान गबार्ड यांनी दिले.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com