जगभरातील कोरोना रुग्ण अडीच कोटींवर;अमेरिकेत ६० लाख; भारत तिसऱ्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
Monday, 31 August 2020

जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक ६० लाख रुग्ण असून त्यानंतर ब्राझील (३८लाख) व भारताचा (३५लाख) क्रमांक लागतो. कोरोनामुळे अमेरिकेतच सर्वाधिक ८ लाख ४२ हजार मृत्यू झाले आहेत.

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचा प्रसार सुरूच असून आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता अडीच कोटींवर गेली आहे. अमेरिकेतील जॉन हाफकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक ६० लाख रुग्ण असून त्यानंतर ब्राझील (३८लाख) व भारताचा (३५लाख) क्रमांक लागतो. कोरोनामुळे अमेरिकेतच सर्वाधिक ८ लाख ४२ हजार मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या चाचण्यांना मर्यादा असल्याने प्रत्यक्षातील रुग्ण यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचा अमेरिकेतील आपत्ती नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा दावा आहे. लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या अनेक रुग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळेही कोरोनाचे प्रत्यक्षातील रुग्ण खूप अधिक असण्याची शक्यताही या केंद्राने वर्तविली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वाधिक मृत्यूचे देश
अमेरिका  - १, ८२,७७९
ब्राझील - १,२०,२६२
मेक्सिको - ६३,८१९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two and a half crore corona patients worldwide India ranks third